-
महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना महिलांसाठी सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो पात्र महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातात. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता सप्टेंबर महिना सुरू होऊन जवळपास १० दिवस झाले तरीही अद्याप लाडक्या बहिणींना मिळालेला नाही. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार? याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं होतं. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना खुशखबर दिली आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार? या विषयीची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर करत दिली आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी महिलांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी ११ सप्टेंबरपासून वितरित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितली आहे.(फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
आदिती तटकरे म्हणाल्या की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस ११ सप्टेंबरपासून सुरुवात करण्यात आलेली आहे.”(फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
“महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे”, असं आदिती तटकरे म्हणाल्या. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार का?
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणींना १५०० रुपये ऐवजी २१०० रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, त्यानंतर लाडक्या बहिणींना १५०० रुपये ऐवजी २१०० कधीपासून देण्यात येणार? यावर अद्याप तरी कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. (फोटो-संग्रहित छायाचित्र)

बापरे एवढी हिम्मत होतेच कशी? नागपुरात भर दिवसा तरुणीला अश्लिल स्पर्श करत हद्दच पार केली; नराधमाचा VIDEO पाहून धक्का बसेल