-
Income Tax Return 2025 : आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर होती.(फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
या मुदतीत आयटीआर न भरल्यास लेट फीसह दंड आणि व्याज भरावं लागेल.(फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
आयटीआर भरण्याची अंतिम तारीख चुकवली तर काय होईल? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. मात्र, १५ सप्टेंबरनंतर आयटीआर दाखल करणाऱ्यांना दंड म्हणून मोठी रक्कम खर्च करावी लागणार आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
अंतिम मुदत चुकवल्याबद्दल काही दंड आहे का? : जरी तुम्ही वर्षाच्या अखेरीपर्यंत विलंबित ITR दाखल करू शकता, परंतु हे लक्षात ठेवा की उशिरा दाखल केल्यास विलंब कालावधीच्या आधारावर दंड आकारला जातो.(फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
किती दंड भरावा लागू शकतो? : १५ सप्टेंबरची अंतिम तारीख चुकल्यानंतरही एखादी व्यक्ती आयटीआर भरू शकते. पण त्यासाठी दंड भरावा लागू शकतो. जर एकूण उत्पन्न ५ लाखांपेक्षा जास्त असेल तर ₹५,००० पर्यंत दंड होऊ शकतो. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
मुदत वाढ मिळणार का? : कोट्यवधी करदात्यांना प्रश्न पडला आहे की, रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढवणार का? पण आता मुदत वाढणार नाहीये. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
आयटीआर भरण्याची आधी मुदत ३१ जुलै २०२५ पर्यंत होती. परंतु प्राप्तीकर विभागाने मे महिन्यात ही मुदत १५ सप्टेंबर पर्यंत वाढवली होती.(फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
दरम्यान, आयटीआर भरण्याची अंतिम तारीख चुकवली असल्याच आता लेट फी सह म्हणजे दंड भरून तुम्हाला या वर्षाचा आयटीआर भरता येणार आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
आयटीआर भरताना काय अडचणी आल्या? आयटीआर भरण्यासाठी संकेतस्थळ धीम्या गतीने सुरू असल्यामुळे करदाते त्रस्त झाले होते. अनेकांना संकेतस्थळावर लॉगिन करण्यात अडचण, फाइलिंग प्रक्रियेत अनेकदा अडथळे आले होते. त्यामुळे आयटीआर भरायचं राहून गेलं असल्यास आता लेट फी सह आयटीआर भरू शकता.(फोटो-संग्रहित छायाचित्र)

Top Political News : गडकरींवर भ्रष्टाचाराचे आरोप, फडणवीसांची दिल्लीवारी ते अजित पवारांना काकांची आठवण; दिवसभरातील ५ घडामोडी