-
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकमधील मेळाव्यात बोलताना राज्यातील ओबीसी आणि मराठा समाज आरक्षणाच्या मुद्यांवर भाष्य केलं. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
नाशिकमधील मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी भर कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांचे कान टोचल्याचं पाहायला मिळालं आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
शरद पवार नेमकं काय म्हणाले? : “अशा प्रकारे बजरंग सोनवणे यांच्याकडे पाहून जितेंद्र आव्हाड यांना प्रश्न विचारण्याची गरज नव्हती”, असं म्हणत शरद पवारांनी जितेंद्र आव्हाड यांना सुनावलं. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
जितेंद्र आव्हाड यांनी भाषण करताना बजरंग सोनवणे यांच्याकडे पाहून काही प्रश्न विचारले होते. मात्र, याच मुद्यावरून शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
“राष्ट्रवादीचा प्रत्येक सहकारी या समाजिक ऐक्याचा प्रश्नांच्या बाबतीत सामाजिक ऐक्य साधणारा हा पक्ष आहे. सामाजिक ऐक्याच्या बाबतीत कोणतीही तडजोड करायची नाही या भूमिकेतून आपण सर्व काम करत आहोत”, असं शरद पवारांनी म्हटलं.(फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
आव्हाडांनी काय विधान केलं होतं? : “गुजर असो किंवा जाट किंवा मराठा. द्या त्यांना आरक्षण. आम्ही लोकसभेत तुमच्याबरोबर उभे राहू. बाप्पा (बजरंग सोनवणे) आपण उभे राहणार की नाही? मराठ्यांसाठी आरक्षणाचा कायदा आणल्यास आमचे सर्व खासदार सरकारबरोबर उभे राहतील.”(फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
आव्हाडांनी काय स्पष्टीकरण दिलं? : “शरद पवारांचा बोलताना संदर्भ मला समजला नाही. पण मी बोलताना माझा संदर्भ कुठेही चुकलेला नाही. त्यांच्या मनात काय होतं? हे मी सांगू शकत नाही. पण माझा काही संदर्भ चुकलाय असं मला वाटत नाही.”(फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
बजरंग सोनवणेंनी काय म्हटलं? : “जितेंद्र आव्हाड माझ्याविषयी बोलले असं नाही, बीडचा विषय आला म्हणून ते माझ्याकडे पाहून बोलले. ते मला खोचकपणे बोलले असं काही नाही. बीडचा विषय आला आणि मी समोर होतो म्हणून त्यांनी माझं नाव घेतलं.”