-
उत्तराखंडमधील देहरादूनमध्ये काल रात्री ढगफुटी झाली ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पूर आला. रस्ते पाण्याखाली गेले, वाहने वाहून गेली आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. सततच्या मुसळधार पावसामुळे सहस्त्रधारामधल्या चंद्रभागा आणि तामसा यासारख्या नद्यांना पूर आला, ज्यामुळे शहराच्या पायाभूत सुविधांवर परिणाम झाला आणि अनेक भागात वाहतूक ठप्प झाली. वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे देहरादूनमधील प्रसिद्ध तपकेश्वर महादेव मंदिरही पाण्याखाली गेले. (Photo: PTI)
-
या विध्वंसानंतर, जिल्हा प्रशासन, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) आणि पोलिसांना तातडीने मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी पाठवण्यात आले. (चित्रात: डेहराडूनमधील प्रेम नगरजवळ ढगफुटीनंतर नदी वाहत असताना विजेच्या खांबावर अडकलेल्या एका व्यक्तीला NDRF चा कर्मचारी वाचवत आहे) (Photo: PTI)
-
उत्तराखंडमध्ये झालेल्या विनाशाच्या लाटेत अनेक वाहने अडकली. एसडीआरएफचे अधिकारी बचाव कार्य करत असताना. (फ्रेममध्ये: डेहराडूनमध्ये मुसळधार पावसामुळे ढगफुटी झाल्यानंतर एक वाहन पाण्यात अडकले आहे.) (Photo: PTI)
-
पुरामुळे शहराला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. (चित्रात: देहरादून-हरिद्वार राष्ट्रीय महामार्गावरील उत्तराखंड दंत महाविद्यालयाजवळ मुसळधार पावसामुळे एक पूल वाहून गेला) (Photo: PTI)
-
मंगळवारी देहरादूनमधील एका बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (Photo: PTI)
-
सोमवारी रात्री ढगफुटीमुळे देहरादूनमध्ये आलेल्या मुसळधार पुरात रस्त्याचा काही भाग वाहून गेला. (Photo: PTI)
-
उत्तराखंडमधील देहरादून येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे तामसा नदी दुथडी भरून वाहत होती आणि प्रसिद्ध तपकेश्वर महादेव मंदिराला पूराने वेढा घातला. मंदिराच्या गर्भग्रहात पाणी शिरले, शिवलिंग पाण्याखाली बुडाले. पाणी एवढे होते की मंदिर परिसरातील हनुमान मूर्तीही पाण्याच्या विळख्यात अडकली. (Photo: PTI)
-
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पूरग्रस्त भागाच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी घटनास्थळाला भेट दिली. मुख्यमंत्र्यांसोबत जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि एसडीआरएफचे कर्मचारी होते. (Photo: PTI) हेही पाहा – जिओ, एअरटेल की व्हीआय? भारतात कोणती टेलिकॉम कंपनी नंबर १; वापरकर्त्यांची ताजी आकडेवारी

‘हे’ झाड तारक की मारक ? इतर राज्यात बंदी, महाराष्ट्रात मात्र धडाक्यात…