-
Who is Petal Gahlot : संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत (UNGA) पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना भारतीय भारताच्या राजनैतिक अधिकारी पेटल गहलोत यांनी खडेबोल सुनावले आहेत. (Photo – Petel Gehlot X Ac)
-
“आज या सभागृहात पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे हास्यास्पद नाटक पाहिलं. ज्यांनी पुन्हा त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा केंद्रबिंदू असलेल्या दहशतवादाचा गौरव केला. पण खोटेपणा सत्य लपवू शकत नाही”, अशा शब्दांत गहलोत यांनी सुनावलं. (Photo-Petel Gehlot X Ac)
-
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताच्या राजनैतिक अधिकारी पेटल गहलोत यांनी शनिवारी पाकिस्तानचा मुखवटा फाडला. सध्या पेटल गहलोत या कोण आहेत? चर्चा सुरू आहे. जाणून घेऊयात.(Photo-Petel Gehlot X Ac)
-
पेटल गहलोत कोण आहेत? : पेटल गहलोत या मूळ दिल्लीच्या आहेत. मुंबईच्या सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी राजशास्त्रात पदवीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्री राम कॉलेज फॉर वूमनमधून पदव्यूत्तर पदवी घेतली.(Photo-Petel Gehlot X Ac)
-
पेटल गहलोत या २०१५ मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत (IFS) रुजू झाल्या. आता त्या संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताच्या सल्लागारांपैकी एक आहेत.(Photo-Petel Gehlot X Ac)
-
जुलै २०२३ मध्ये पेटल गहलोत यांची संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनमध्ये प्रथम सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे. (Photo-Petel Gehlot X Ac)
-
संयुक्त राष्ट्र संघटनेत नियुक्ती होण्याच्या आधी पेटल गहलोत यांची २०२० ते २०२३ या दरम्यान त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या युरोपियन पश्चिमी विभागात सहसचिव म्हणून काम केलेलं आहे.(Photo-Petel Gehlot X Ac)
-
दरम्यान, परराष्ट्र धोरणाबरोबरच संगीतामध्येही पेटल गहलोत यांना आवड आहे. त्या अतिशय उत्तम गिटार वादक आहेत, तसेच त्या गाणेही गातात.(Photo-Petel Gehlot X Ac)
-
पेटल गहलोत यांना गिटार डिप्लोमॅट असंही संबोधलं जातं. तसेच जेव्हा त्यांनी बेला सियाओ हे प्रसिद्ध इटालियन गाणं गायलं तेव्हा ते सोशल मीडियावर खूप लोकप्रिय झालं होतं.(Photo-Petel Gehlot X Ac)