-
ती शाळकरी मुलगी होती, त्या वेळची ही गोष्ट. जगात प्रज्ञेचा अर्क मानल्या जाणारा वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाइन यांची तिने भेट घेतली होती. आइनस्टाइन यांनी तिच्या गणिती कौशल्याची पारख करण्याचे ठरवले अर्थातच समोर एक फळा व खडू ठेवलेला होता. त्यांनी तिला एक अवघड असा गणिती कूटप्रश्न विचारला. त्यांनी तो प्रश्न विचारून संपवण्याच्या आत छोट्या शकुंतलाने त्याचे उत्तर फळ्यावर लिहिले होते अन् ते बरोबरही होते. फळा आकडय़ांनी भरून वाहत होता. आइनस्टाइन यांनाही तोंडात बोटे घालायला भाग पाडणाऱ्या त्या मुलीचे नाव शकुंतला देवी…
-
त्या भेटीत छोट्या शकुंतलाचे गणिती कौशल्य बघून आइनस्टाइन चक्रावून गेले होता. तो म्हणाला, तुला जो कूटप्रश्न मी दिला, तो सोडवायला मला तीन तास लागतील व बाकी कुणा प्राध्यापकांना सोडवायला दिला तर किमान सहा तास लागतील, तू तर क्षणार्धात उत्तर दिलेस. याचे रहस्य काय, असे आइनस्टाइनने विचारले, त्यावर ती म्हणाली, “मी हे कसे करू शकते हे मला माहीत नाही.. पण माझ्या डोळ्यासमोर सतत आकडे तरळत असतात, अंतप्रेरणेने ते घडते.” (Photo: Twitter/ChroniclesClio)
-
विविध भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री विद्या बालनने प्रमुख भूमिका साकारलेला शकुंतला देवी यांच्या जीवनावर आधारित ‘शकुंतला देवी’ हा चित्रपट आठवडाभरात प्रदर्शित होत आहे. ३१ जुलै रोजी अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होत असलेला ‘शकुंतला देवी’ हा सिनेमा घरबसल्या बघता येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ‘मानवी संगणक’ म्हणून ओळखल्या गेलेल्या शकुंतला देवी यांच्याबद्दलची चर्चा सोशल नेटवर्किंगवर सुरु झाली आहे.
-
कोणतंही औपचारिक शिक्षण नसताना शकुंतला देवी वयाच्या तिसऱ्या वर्षीच कोणतीही आकडेमोड झटक्यात आणि बिनचूक करू शकायच्या. त्यांच्या या कौशल्याची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती. याच शकुंतला देवींबद्दल आपण या फोटोगॅलरीमधून काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत… (Photo: Twitter/IndiaHistorypic)
-
वयाच्या तिसऱ्या वर्षी वडिलांबरोबर पत्ते खेळत असताना छोट्या शकुंतलाने पत्त्यांचा क्रम लक्षात ठेवून त्यांना लीलया पराभूत केले, तेव्हाच वडिलांना तिच्या प्रज्ञेची चुणूक दिसली होती.
-
वयाच्या दहाव्या वर्षी शकुंतलाला एका कॉन्व्हेंट शाळेत वडिलांनी पहिल्या वर्गात दाखल केले होते पण महिन्याची दोन रुपये फी देऊ न शकल्याने छोटय़ा शंकुतलेचे शिक्षणाचे स्वप्न कायम अधुरेच राहिले.
-
शकुंतला देवी यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९३९ मध्ये बंगलोर येथे कर्मठ ब्राह्मण कुटुंबात झाला, त्यांचे वडील सर्कशीत झोक्यावरचे खेळ सादर करायच्या. (Photo : Twitter/vidya_balan)
-
म्हैसूरला एका विद्यापीठात शकुंतला देवी यांनी गणितज्ञांसमोर अनेक आकडेमोडी क्षणार्धात करून दाखवल्या, तेव्हापासून त्यांचे नाव जगासमोर आले. (Photo : Twitter/Sreeraamsharma)
-
शकुंतला देवी यांनी लंडनच्या इम्पिरियल कॉलेजमध्ये तेरा आकडी दोन संख्यांचा गुणाकार अवघ्या २८ सेकंदांत करून गिनीज बुकात नाव कोरले होते. (Photo : Twitter/Sreeraamsharma)
-
१९७० मध्ये शकुंतला देवी यांना एका संस्थेने जर्मनीत बोलावले होते. तेथे त्यांनी संगणकाला हरवले. त्या संस्थेने त्यांना मर्सिडीज बेन्झ गाडी बक्षीस दिली. (Photo : Indian Express)
-
अमेरिकेतही शकुंतला देवी यांनी २०१ अंक असलेल्या संख्येचे घनमूळ अवघ्या पन्नास सेकंदांत काढले. तीच आकडेमोड करण्यास संगणकाला १२ सेकंद जास्त लागले. (Photo : Twitter/Sreeraamsharma)
-
पुढे, आकडेमोडीची अनेक आव्हाने पेलणारे शकुंतला देवींचे प्रयोग ठिकठिकाणी होऊ लागले. लोकांचा या प्रयोगांना प्रतिसादही वाढू लागला.
-
गणिताचे जाहीर कार्यक्रम करण्यासाठी शकुंतला देवींनी जगभर दौरे केले होते. गणिताचं त्यांचं कौशल्य पाहून भलेभले अचंबित होत.
-
गणित शिकवण्याच्या पद्धतीतील दोषांमुळेच मुलांना गणिताची भीती वाटते असे शकुंतला देवींचे मत होते.
-
शकुंतला देवींनी गणितावर, ज्याोतिषशास्त्रावर पुस्तकं लिहिली. समलैंगिकतेविषयीचं भारतामधलं पहिलं पुस्तक त्यांनी लिहिलं होतं. (Photo : Twitter/da1v1k)
-
‘मानवी संगणक’ हे नामाभिधान प्राप्त करणाऱ्या या शकुंतला देवी यांचं ८३ व्या वर्षी २१ एप्रिल २०१३ रोजी वृद्धापकाळाने निधन झालं.
-
२०१३ साली गुगलने खास डुडलच्या माध्यमातून ४ नोव्हेंबर रोजी शकुंतला देवी यांच्या ८४ व्या जयंतीनिमित्त त्यांना अशाप्रकारे श्रद्धांजली वाहिली होती.

बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर