-
तुर्कमेनिस्तानमध्ये सत्तेत असणाऱ्या गुरबांगुली बेर्दयमुखमदोव यांनी आपल्या लाडक्या कुत्र्याची ५० फूट उंचीचा पुतळा उभारला आहे. (सर्व फोटो रॉयटर्स आणि ट्विटवरुन साभार)
-
गुरबांगुली यांच्या या लाडक्या कुत्र्याच्या पुतळ्यावर २४ कॅरेट सोन्याचा मुलामा देण्यात आलाय.
-
हा पुतळा देशाची राजधानी असणाऱ्या अश्गाबातमध्ये उभारण्यात आल्याचे बीबीसीने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
-
२००७ मध्ये सत्तेत आलेल्या गुरबांगुली यांनी बुधवारी अलबी प्रजातीच्या या कुत्र्याच्या पुतळ्याचे अनावरण केलं.
-
हा पुतळा खास प्रकारच्या कांस्य धातूपासून तयार करण्यात आला आहे. त्यामुळेच ऊन, वारा, पाऊस या सर्वांपासून हा सुरक्षित राहिलं असं सांगितलं जात आहे.
-
तुर्कमेनिस्तानमधील अनेक प्रमुख अधिकारी देशाची राजधानी असणाऱ्या अश्गाबातमधील ज्या परिसरामध्ये राहतात तिथेच हा पुतळा उभारण्यात आला आहे.
-
अलबी प्रजातीच्या कुत्रे जगभरातील श्वानप्रेमींमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत.
-
हे अलबी प्रजातीचे कुत्रे प्रामुख्याने तुर्कमेनिस्तानमध्येच आढळून येतात.
-
त्यामुळेच गुरबांगुली या कुत्र्याकडे राष्ट्रीय ओळख अशा दृष्टीतूनही पाहतात असं सांगण्यात येतं.
-
सध्या हा पुतळा सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरत आहे.

रात्री झोपताना ‘ही’ लक्षणं दिसली तर लिव्हर-किडनीचा धोका! पायावरील ‘अशा’ खुणांकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर…