-
पुणेकरांची आजची सकाळी प्राणी दर्शनानं झाली. कोथरूडमध्ये रानगवा आल्याचं कळलं आणि ही बातमी काही क्षणात सगळ्या पुण्यात पसरली. कोथरुड भागातील महात्मा सोसायटीमधील नागरिकांसाठी आजची सकाळ आश्चर्याचा धक्का देणारी ठरली. सोसायटीमध्ये सकाळी रानगव्याचं दर्शन झालं. त्यानंतर दुपारपर्यंत सगळीकडे गव'गवा' झाला होता. दुपारपर्यंत लक्ष वेधून घेणाऱ्या गवाने मात्र, जाताना डोळ्यात अश्रू आणून गेला. (छायाचित्र/फैजल खान/ट्विटर)
-
रानगवा आणि तोही कोथरूडमध्ये… मग काय एकच धावपळ. वन विभागाच्या अधिकाऱ्यांपेक्षा जास्त दगदग झाली ती बघ्याची.
-
सकाळी साडेअकराच्या सुमारास वन अधिकारी या ठिकाणी दाखल झाले. तोपर्यंत गवा उजवी भुसारी कॉलनीमधील एका सोसायटीमध्ये पार्किंगमध्ये शिरला.
-
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर काहींनी त्याला पाहण्याससाठी गर्दी केली. वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दोरीच्या मदतीने पकडण्याचे प्रयत्न सुरू केले.
-
काही तासानंतर रानगव्याला पकडण्यात यश आलं. पण, त्यानंतर ट्विटरवर पुणेरी पाट्यांच्या मीम्सचा पाऊस पडला.
-
फैजल खान नावानं असणाऱ्या ट्विटर हॅण्डलवर रानगव्याचा फोटो पोस्ट करण्यात आला होता. त्या फोटोला कॅप्शन सूचवा असं म्हटलं होतं.
-
त्यावर नेटकऱ्यांच्या चांगल्याच उड्या पडल्या. अनेकांनी राजकीय अंगांनी कॅप्शन सूचवल्या, तर काहींनी इतर विषयांवरून फोटो ओळी सूचवल्या.
-
या सगळ्या फोटो ओळी भन्नाट आहेत. जणू काही तो रानगवाच बोलत असल्याचं हे मीम्स बघताना वाटतं.
-
रानगव्याचा शांत उभ असतानाचा फोटो पोस्ट करण्यात आला होता.
-
रानगवा गर्दीच्या दिशेनं बघताना दिसत आहे.
-
दोरीच्या मदतीनेही गवा ताब्यात येत नव्हता. गव्याला इंजेक्शन देण्यात आले आहे. तरी देखील वन कर्मचाऱ्याच्या अधिकार्यांना गव्यावर नियंत्रण मिळवणं शक्य होतं नव्हतं.
-
अथक प्रयत्नानंतर रानगव्याला पकडण्यात यश आलं. त्याला बेशुद्धही करण्यात आलं.
-
लोकवस्तीमध्ये शिरल्याने काही ठिकाणी धडक दिल्याने गव्याच्या तोंडाला काही प्रमाणात दुखापत झाली होती.
-
गव्याला इंजेक्शन देण्यात आले. तरी देखील वन कर्मचाऱ्याच्या अधिकार्यांना गव्यावर नियंत्रण मिळवणं शक्य होतं नव्हतं.
-
पुणेकरांची भंबेरी उडवणारा रानगवा मात्र, माणसांच्या गर्दीत जीव गमावून बसला. वन विभागाने गवा पकडला. त्याला घेऊन जात असतानाच त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे प्राणीमित्रांसह नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

चाळिशीनंतर रात्रीचे जेवण टाळावे का? दिवसातून एकदा जेवणे अन् रात्रीचा उपवास करण्याबाबत तज्ज्ञ काय सांगतात…..