-
आईसोबत घराची साफसफाई करत असताना एका व्यक्तीला त्याच्या आजोबांची जुनी डायरी सापडली. विशेष म्हणजे त्या डायरीमध्ये महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, डॉ. भीमराव आंबेडकर आणि सी.व्ही. रमण यांच्यासारख्या ख्यातनाम व्यक्तींच्या स्वाक्षर्या आहेत. त्याने यासंबंधीचे फोटोही ट्विटरवर शेअर केलेत. विजय बसरुर नावाच्या एका व्यक्तीने या स्वाक्षऱ्यांचे फोटो ट्विटरवर शेअर केले असून त्यासोबत एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी, "काही दिवसांपूर्वी आईसोबत घरात साफसफाई करत होतो. त्यावेळी असं काहीतरी भेटलं ज्याबाबत गेल्या ३० वर्षांपासून मला पुसटशी कल्पनाही नव्हती. मला आजोबांचं ऑटोग्राफ बूक सापडलं, आणि त्यात महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, भीमराव आंबेडकर आणि सी.व्ही. रमण यांच्या सह्या आहेत", असं म्हटलंय.
-
विजय बसरुर यांनी शेअर केलेल्या फोटोंवर स्वाक्षरीसोबतच तारीखही नमूद करण्यात आली आहे. त्यानुसार, महात्मा गांधींची सही 25 फेब्रुवारी 1938 रोजीची आहे.
-
दुसरा फोटो नेहरुंच्या स्वाक्षरीचा असून त्याखाली 10 फेब्रुवारी 1937 तारीख आहे.
-
तर, तिसरा फोटो सी.व्ही. रमण यांच्या स्वाक्षरीचा आहे. पण, त्यांच्या स्वाक्षरीसोबत तारीख नमूद करण्यात आलेली नाही.
याशिवाय, अखेरचा फोटो डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या स्वाक्षरीचा आहे. त्यांची स्वाक्षरी 17 जानेवारी 1948 रोजीची आहे. विजय यांनी शेअर केलेले हे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. त्यावर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत असून बहुतांश युजर्सकडून, 'सर्व स्वाक्षऱ्या मौल्यवान आहेत, हा अनमोल ठेवा योग्यरित्या जतन करुन ठेव' असा सल्ला विजय यांना दिला जात आहे.

CJI B.R Gavai: भटक्या कुत्र्यांविरोधातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर देशभरातून नाराजी; सरन्यायाधीश बी. आर. गवई म्हणाले, “मी…”