-
स्टारकिड्स हा कायम चर्चेचा विषय असतो. बॉलिवूड स्टार्सची मुलं असोत किंवा क्रिकेटपटूंची मुलं असोत, त्यांच्याबद्दल कायमच जाणून घ्यायला साऱ्यांना आवडतं.
-
भारतात क्रिकेटला धर्म मानतात. त्यामुळे एखाद्या क्रिकेटपटूच्या खासगी आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घेण्याची साऱ्यांनाच उत्सुकता असते.
-
क्रिकेटपटूंची मुलं हादेखील कायमच एक चर्चेचा विषय असतो. सचिनची मुलगी सारा तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनीची मुलगी झिवा किंवा अगदी अलिकडेच बाबा झालेला हार्दिक पांड्या आणि त्याचा गोंडस मुलगा अगस्त्य…
-
१०-१५ वर्षांपूर्वी सोशल मीडियाचं स्वरूप भारतात तितकंसं व्यापक नव्हतं. पण सध्या सोशल मीडियाची व्याप्ती पाहता या स्टारकिड्सची दररोज चाहत्यांना माहिती मिळत राहते.
-
भारताचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा स्टँकोविच यांना ३० जुलैला पुत्ररत्न प्राप्ती झाली.
-
हार्दिक-नताशा आई-बाबा झाल्याचे हार्दिकने स्वत: ट्विट करून सांगितलं. लॉकडाउन काळात हार्दिकने आपली गर्लफ्रेंड नताशा गरोदर असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती.
-
त्यानंतर ३० जुलैला हार्दिकने बाळाच्या हातात आपला हात असल्याचा खूप गोंडस फोटो पोस्ट करत साऱ्यांना ही गोड बातमी सांगितली.
-
हार्दिक आणि नताशा यांनी आपल्या बाळाचं नाव अगस्त्य असं ठेवलं.
-
हार्दिक आणि नताशा अनेक वेळा आपल्या बाळाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.
-
नताशाने बाळाला जन्म दिल्यानंतर काही दिवसांतच हार्दिकने आपल्या बाळासोबतचा एक फोटो पोस्ट केला होता.
-
काही काळ आपल्या बाळासोबत वेळ घालवल्यानंतर त्याला IPLसाठी दुबईला जावे लागलं. त्यावेळी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून तो आपल्या बाळाशी गप्पा मारायचा. तसे फोटोही नताशाने पोस्ट केले आहेत.
-
नुकताच हार्दिक आपल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परत आला. तेव्हा अगस्त्यला बाटलीने दूध पाजतानाचा फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
-
हार्दिक किंवा नताशाचे अगस्त्यसोबतचे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस पडताना दिसतात.
-
अगस्त्यच्या फोटोंना मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स मिळत असतात.
-
अगस्त्यने मोठं होऊन आपल्या वडिलांसारखंच अष्टपैलू क्रिकेटपटू व्हावं असं अनेक चाहते फोटोवर कमेंट्स करताना दिसतात.
-
(सर्व फोटो सौजन्य : हार्दिक पांड्या/ इंस्टाग्राम)

Uddhav Thackeray : ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे हे मान्य आहे का?’ उद्धव ठाकरे म्हणाले, “मी…”