-
सोशल मीडियावर सध्या एका बेटावरील घराचे फोटो व्हायरल होत आहे. हे घर सध्या Loneliest House In The World म्हणजेच सर्वात एकांतवासात असलेलं घर म्हणून चर्चेत आहे. याच घराबद्दल आज आपण या गॅलरीमधून जाणून घेणार आहोत.
-
चहूबाजूंनी हिरवळ असलेल्या एका बेटावरील डोंगराच्या कुशीत हे पांढऱ्या रंगाचं घर वसलेलं आहे.
-
निळ्याशार समुद्रामध्ये एक बेट आणि त्यावर केवळ एकच घर असा नजारा आकाशामधून दिसतो. त्यामुळेच या घराबद्दल अनेक गोष्टी, अख्यायिका सांगितल्या जातात.
-
१८ व्या आणि १९ व्या शतकापर्यंत या ठिकाणी आजूबाजूच्या बेटांवर काही लोकवस्ती होती असं सांगितलं जातं. हे एकमेव घर बेट आइसलॅण्डच्या दक्षिणेला असणाऱ्या वेस्टमॅनायेजर द्वीपसमूहाचा भाग आहे.
-
१८ व्या आणि १९ व्या शतकापर्यंत या ठिकाणी आजूबाजूच्या बेटांवर काही लोकवस्ती होती असं सांगितलं जातं. हे एकमेव घर असणारं बेट आइसलॅण्डच्या दक्षिणेला असणाऱ्या वेस्टमॅनायेजर द्वीपसमूहाचा भाग आहे.
-
हे बेट आइसलॅण्डच्या दक्षिणेकडील समुद्रामध्ये आहे. या बेटावरील डोंगराचं नाव एडलीआयी असं आहे.
-
१९३० साली या द्वीपसमूहातील बेटांवरुन सर्वजण दुसरीकडे स्थलांतरित झाले. मुख्य जमीनीवर गेल्यावर आपल्याला चांगले राहणीमान आणि नोकऱ्या मिळतील या आशेने येथून लोकं स्थलांतरित झाल्याचं सांगण्यात येतं.
-
त्यामुळेच मागील जवळजवळ ९० वर्षांपासून निर्मनुष्य असणाऱ्या या बेटांपैकी एका बेटावर हे असं घर दिसत असल्याने त्याच्याबद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टी सांगण्यात येत आहेत.
-
एका अख्यायिकेनुसार हे घर एका अब्जाधीशाने बांधलं होतं. झॉम्बीजने हल्ला केल्यास संपूर्ण एडलीआयी पूर्णपणे वसवण्याच्या उद्देशाने या श्रीमंत माणसाने निर्जनस्थळी राहण्यासाठी हे घर बांधल्याचं सांगितलं जातं.
-
तर काही जण हे छानसं घर धार्मिक संन्यास्यांपैकी एकाचं असल्याचं सांगतात.
-
एकेकाळी तर हे घर बीजॉर्क या लोकप्रिय गायचं असल्याचं सांगण्यात आलं होतं. तसेच बीजॉर्कला हे संपूर्ण बेट विकत घ्यायचं होतं त्यासंदर्भात तो सरकारशी चर्चाही करत असल्याचं काहीजण सांगतात.
-
अनेक कथा सांगितल्या जात असल्या तरी या घराची खरी गोष्ट वेगळीच आहे. हे खरं एडलीआयी हंटींग असोसिएशनने बांधलं आहे असं द सनने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
-
या बेटावर उत्तर अटलॅंटिकजवळील प्रदेशात आढळणारा पफिन नावाचे सागरी पक्षी मोठ्या संख्येने वास्तव्यास होते. या पक्षांना बेटाजवळ माशांची शिकार करता यायची त्यामुळे या भागात त्यांची संख्या खूप जास्त होती.
-
पफिन पक्षांची शिकार करण्याच्या उद्देशाने शिकाऱ्यांना थांबण्यासाठी आणि बेस कॅम्प म्हणून वापर करता यावा म्हणून हे घर बांधण्यात आलं होतं.
-
या घरामध्ये पावसाचं पाणी साठवण्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टींगची सोय करण्यात आली होती.
-
हे घर दिसायला जरी सुंदर वाटत असलं तरी त्यामध्ये फारशा सुविधा नाहीयत.
-
या घरामध्ये वीजपुरवठा नाही. येथे प्लम्बिंगचं काम करण्यात आलेलं नसल्याने घरात पाण्याची सोय नाहीय.
-
काही सोयीसुविधा नसल्या तरी या घरातून आजूबाजूचा निर्सग पाहताना हरवून जायला होतं.
-
या बेटाला संरक्षित परिसर म्हणून घोषित करण्यात आलं आहे. या बेटावर अनेक सागरी पक्षांचा निवारा असल्याने हा भागा संरक्षित ठेवण्यात आलाय. या बेटाला आणि बेटावरील घराला भेट देण्यासाठी काही कंपन्या एक दिवसाची ट्रीप या बेटावर घेऊन जातात.
-
मात्र दुसरीकडे मानवाचा जास्त हस्ताक्षेप नसल्यानेच हे बेट आहे त्या परिस्थितीमध्ये अधिक सुंदर राहिल्याचं मतही अनेकजण सोशल नेटवर्किंगवर व्यक्त करताना दिसत आहे. (सर्व फोटो ट्विटर आणि द सनवरुन साभार)

“दिलखुलास हसणारी आमची आई…”, तेजस्विनी पंडितला मातृशोक, ज्योती चांदेकर यांनी ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…