-
ब्राझीलचे डॉक्यूमेंट्री फिल्ममेकर एर्नेस्टो यांनी कधी स्वप्नातही विचार केला नसेल असा अनुभव त्यांना आला आहे. विमानात प्रवास करत असताना चक्क त्यांचा iPhone खाली पडला.
-
एर्नेस्टो कॅब्रो फ्रिओ येथे विमानातून प्रवास करत होते. यावेळी त्यांनी काही क्षण टिपण्यासाठी मोबाइल विमानाच्या छोट्या खिडकीतून बाहेर काढला.
-
यावेळी त्यांनी काही क्षण टिपण्यासाठी मोबाइल विमानाच्या छोट्या खिडकीतून बाहेर काढला.
-
मात्र यावेळी हवेच्या वेगाने त्यांच्या हातातून मोबाइल निसटला आणि खाली जाऊन पडला. एर्नेस्टो यांना आता आपला फोन सापडणार नाही असंच वाटत होतं.
-
युट्यूबवर विमानातील हा व्हिडीओही शेअर करण्यात आला आहे.
-
एर्नेस्टो यांना वाटलं आता काही आपला फोन मिळणार नाही. पण जेव्हा त्यांनी जीपीएस ट्रॅकिंगचा वापर केला तेव्हा मोबाइल बीचजवळच पडला असल्याचं दिसलं.
-
मोबाइल मिळण्यासाठी ते बीचच्या दिशेने गेले आणि तिथे ९८४ फुटांवरुन पडलेला मोबाइल सुरक्षित असल्याचं पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.
-
स्क्रीन प्रोटेक्टर आणि कव्हरचं थोडं नुकसान वगळता मोबाइल एकदम सुरक्षित असल्याचं एर्नेस्टो यांनी सांगितलं आहे.
-
विशेष म्हणजे मोबाइलमध्ये १५ सेकंदाचा विमानातून खाली पडतानाचा व्हिडीओही शूट झाला आहे.
-
समुद्रापासून २०० मीटर अंतरावर हा मोबाइल पडला होता. विशेष म्हणजे यावेळी मोबाइलची बॅटरीही १६ टक्क्यांपर्यंत होती.

सरन्यायाधीश भूषण गवई यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची तातडीने भेट; मोठी घडामोड घडणार?