-
गुगलच्या सॅटेलाइट इमेजेसमध्ये एका वाळवंटामध्ये अपघातग्रस्त विमान आढळून आलं आहे. पृथ्वीचा नकाशा पाहण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बर्ड आय व्ह्यूमध्ये हे विमान एका वाळवंटामध्ये असल्याचं दिसून येत आहे. वाळूच्या ढिगाऱ्यावर दूरदूरपर्यंत काहीच दिसत नसताना हे विमान मात्र स्पष्टपणे दिसत आहे. हे विमान वाडी बू अल हासम या लिबियामधील हवाईपट्टीजवळ आढळलं आहे. वाळवंटामध्ये पडणार सूर्यप्रकाश आणि सूर्याच्या दाहकतेमुळे हे विमान गुगल मॅपवर उठून दिसतं. त्यामुळेच अगदी वाळवंटात असतानाही गुगल सर्च करताना ते डोळ्यात भरतं. रेडइटवर यासंदर्भात सध्या जोरदार चर्चा सुरु असल्याचे वृत्त एक्सप्रेस डॉट को डॉट युकेने दिलं आहे. अनेक गुगल अर्थ फोटोग्राफर्सने या विमानाचे फोटो रेडइटवर शेअऱ केले आहेत. (फोटो: गुगल मॅप्सवरुन साभार)
-
गुगल मॅपवरील थ्रीडी मॅपचा वापर करुन या विमानामधील दृष्यही दिसत आहेत. यामध्ये विमानाच्या आत खूप नुकसान झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. तुटलेला दरवाजा, लटकणाऱ्या वायर्स वगैरे गुगलवर अगदी स्पष्टपणे दिसत असल्याचं रेडइटवर शेअर करण्यात आलेल्या फोटोंवरुन स्पष्ट होतं. विमानाच्या कॉकपीटला म्हणजेच चालक बसतो त्या भागाला मोठं नुकसान झालं आहे. विमानाचा दरवाजा पूर्णपणे निखळला असून तो खाली पडल्याचे यामध्ये दिसते. (फोटो: गुगल मॅप्सवरुन साभार)
-
मलेशिया एअरलाइन्सचे एमएच-३७० हे विमान ८ मार्च २०१४ रोजी ‘बेपत्ता’ झाल्यापासून अनेक नेटकरी गुगल मॅपच्या मदतीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. हे विमान बेपत्ता झाल्याची घोषणा २०१५ मध्ये करण्यात आली. २३९ प्रवाशांना घेऊन जाणारे सदर विमान गूढरीत्या बेपत्ता झालं. तेव्हापासून नेटकरी याचा शोध घेत असून गुगल मॅपवर कुठेतरी याचे अवशेष मिळतील अशी त्यांना अपेक्षा आहे. मात्र हे विमान एमएच-३७० असण्याची शक्यता अगदीच तुरळक आहे. लिबियाच्या वाळवंटामध्ये सापडलेलं हे मलेशियन एअरलाइन्सच्या ३७० च्या बोईंग ७७७ प्रवासी विमानाच्या आकारापेक्षा खूपच छोटं आहे. (फाइल फोटो)
-
आश्चर्याची बाब म्हणजे लिबियातील या विमानाचे फोटोसमोर आल्यानंतर रेडइटच्या युझर्सने या विमानाचा इतिहास शोधून काढलाय. या विमानाला नुकसान झालं असलं तरी त्याचा बराचसा भाग हा सुस्थितीत आहे. काहींनी हे विमान काही खास उद्देशाने इथे सोडून देण्यात आलं असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. तर काहीजण हे विमान केवळ उडू शकत नाही म्हणून इथे असल्याचं मत व्यक्त केलं आहे. "या विमानाचा पहिल्या फोटोचा संदर्भ हा ६ ऑक्टोबर २००८ चा सापडतोय. म्हणजेच हा अपघात त्यापूर्वी झाला असणार," अशी कमेंट एका युझरने केली आहे. तर अन्य एकाने, "१९९२ मध्ये लिबियात यासिर अलाफातचे एएन २६ हे विमान ८ एप्रिल १९९२ रोजी धुळीच्या वादळामुळे कोसळलं होतं. या विमानामध्ये १३ प्रवासी होते. दोन्ही वैमानिक आणि इंजिनियरचा या अपघातात मृत्यू झाला होता," अशी कमेंट केली आहे. या विमानाने धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न केला मात्र वादळामुळे त्याचा अपघात झाला असंही सांगण्यात येत आहे. मात्र हे विमान दिसण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीय. यापूर्वीही या विमानासंदर्भात चर्चा झाल्यात. (फोटो: गुगल मॅप्सवरुन साभार)
-
गुगल मॅपचा वापर करणाऱ्या ईगल आय व्ह्यूवर्सने अनेकदा या विमानाचा फोटो शेअर करुन हे विमान म्हणजे मलेशिया एअरलाइन्सचे एमएच-३७० असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र अनेकदा हा दावा खोडून काढण्यात आला आहे. हे विमान मलेशिया एअरलाइन्सचे एमएच-३७० असल्याचा पुरावा म्हणून काहीच माहिती उपलब्ध नसल्याचे अनेकजण सांगतात. गुगल मॅपच्या थेअरीवरच विश्वास ठेवायचा झाल्यास एमएच-३७० चे अवशेष समुद्रकिनाऱ्यांवर सापडल्याचा दावा अनेकांनी अनेकदा केला आहे. या विमानाचा मार्ग आणि ते ज्या पद्धतीने बेपत्ता झाले त्यावरुन ते समुद्रात कोसळल्याची शक्यता अधिक असल्याचे सांगितले जाते. (फाइल फोटो)

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली