-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम लवकरच सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या प्रकल्पाच्या गुजरातमधील कामाचं कंत्राट लार्सन अॅण्ड टुब्रोला मिळालं आहे. दरम्यान, या मार्गावर धावणाऱ्या बुलेट ट्रेनचे फोटो समोर आले आहेत. जपानच्या भारतातील दूतावासाने हे फोटो पोस्ट केले आहेत.
-
महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांना हा प्रकल्प जोडणार असून, गुजरातमधील कामाची ऑर्डर एल अॅण्ड टी या कंपनीला मिळाले आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी हा एक महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. मागील काही वर्षांपासून यासाठी जमीन अधिग्रहणाची तयारी सुरू होती.
-
हा देशातील पहिलाच बुलेट ट्रेन प्रकल्प आहे. गुजरातमधील कामाचं कंत्राट मिळवण्यात लार्सन अॅण्ड टुब्रो ही कंपनी यशस्वी ठरली आहे. काही दिवसांपूर्वी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं (एनएचएसआरसीएल) १.०८ लाख कोटी कामाची निविदा खुली केली. ५०८ किमी लांबीच्या या कामासाठी आठ कंपन्या बोली लावण्यासाठी पात्र ठरल्या होत्या.
-
या आगामी बुलेट ट्रेनमुळे दोन शहरांतील अंतर दोन तासात गाठता येणार आहे. या निविदेमध्ये गुजरातमधील वापी ते वडोदरा या दरम्यानच्या एकूण आखणीच्या ४७ टक्के कामाचा समावेश आहे. यात चार रेल्वे स्थानके असणार आहेत. वापी, सुरत, भरूच आणि बिल्लीमोरा अशी त्यांची नावं आहेत. त्याचबरोबर २४ नद्या, ३० महामार्ग क्रॉसिंग असणार आहे.

HR’s Post on Unethical Resignaton : १० वाजता पगार, १० वाजून ५ मिनिटांनी पाठवला राजीनामा; नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करणारी एचआरची पोस्ट चर्चेत