-
डिजिटल माध्यमांमुळे कमाईचे नवीन मार्ग खुले झालेत असं आपण अनेकदा ऐकलं असणारा. मात्र याचे मुर्तीमंत उदाहरण आहे ९ वर्षाचा एक चिमुकला ज्याचं नाव आहे रायन काजी.
-
रायन हा जगातील सर्वाधिक कमाई करणारा सर्वात तरुण युट्यूबर ठरला आहे. २०२० या वर्षात रायनने तब्बल २१७ कोटी रुपये कमावले आहेत.
-
फोर्सब्सने नुकतीच '२०२० मध्ये सर्वाधिक कमाई करणारे युट्यूबर्स' अशी यादीच जाहीर केली असून त्यामध्ये रायनचाही समावेश आहे.
-
फोर्सब्सच्या या यादीमध्ये सलग तिसऱ्यांदा रायन अव्वल स्थानी आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार रायनने त्याच्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून यंदाच्या वर्षी २९.५ मिलियन डॉलर म्हणजेच २१७ कोटी रुपये कमावले आहेत.
-
रायनच्या युट्यूब चॅनेलचे नाव रायन्स वर्ल्ड असं आहे. या चॅनेलवर तो खेळणी आणि गेम्सचे रिव्ह्यू पोस्ट करत असतो.
-
याशिवाय रायनने २०० मिलियन डॉलर्स म्हणझेच एक हजार १४७२ कोटी रुपयांची अतिरिक्त कमाई या चॅनेलच्या नावाने असणारी खेळणी आणि कपड्यांच्या व्यवसायातून केली आहे. रायनच्या नावाने आता एक टॉय आणि क्लोथिंग ब्रॅण्ड आहे.
-
युट्यूबच्या माध्यमातून जगभरातील पालकांच्या आणि मुलांच्या मनामध्ये आपल्या टॉय रिव्ह्यूजच्या माध्यमातून विश्वास निर्माण करणारा रायन लवकरच त्याच्या एका टीव्ही शोमध्ये दिसणार आहे.
-
निकालोडियन्स या मुलांसाठीच्या वाहिनीने टीव्ही शोसंदर्भात रायनसोबत करार केला असून यामधूनही त्याने घसघशीत कमाई केलीय.
-
रायन हा सध्या जाहिरात विश्वामध्ये चाइल्ड इन्फ्यूयन्सर म्हणून ओळखला जातो.
-
त्यामुळेच कोलगेट, रोकू. वॉलमार्टसारख्या बड्या ब्रॅण्डने रायनसोबत करार केले आहेत. त्याचप्रमाणे हूलू या नेटवर्कींग ब्रॅण्डनेही रायनला करारबद्ध केलं आहे.
-
मार्च २०१५ साली रायनचं पहिलं युट्यूब चॅनेल सुरु केलं.
-
तेव्हापासून आतापर्यंत रायनच्या या चॅनेलचे दोन कोटी ७६ लाख फॉलोअर्स झाले आहेत.
-
रायनला त्याचे आई-बाबा व्हिडीओ बनवण्यासाठी मदत करतात.
-
रायनला दोन लहान बहिणीही आहेत. अनेक व्हिडीओंमध्ये त्या दिसतात.
-
रायनचे कुटुंबीय एकूण आठ चॅनेल चालवतात. सर्व चॅनेलच्या सब्रस्कायबर्सची एकूण संख्या चार कोटी १७ लाख इतकी आहे. एकूण व्ह्यूज १२२० कोटी इतके आहेत.
-
रायनबरोबरच त्याचे आई-वडीलही मोठ्या हौसेने या व्हिडीओंसाठी काम करतात.
-
रायन हा मागील अनेक वर्षांपासून सर्वादिक कमाई करणारा सर्वात तरुण युट्यूबर आहे.
-
सर्वाधिक कमाई करणाऱ्या युट्यूबर्सच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर जिमी डोनाल्डसनचा क्रमांक लागतो.
-
जिमीच्या चॅनेलचे नाव मिस्टर बिस्ट असं आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार मिस्टर बिस्टने या वर्षी २४ मिलियन डॉलर म्हणजेच १७६ कोटी ६० लाख रुपये कमावले आहे.
-
जिमीने २०१६ मध्ये कॉलेजमधून ड्रॉप आऊट म्हणून बाहेर पडल्यानंतर आपलं युट्यूब चॅनेल सुरु केलं. जानेवारी २०१७ मध्ये त्याचा एका व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. यामध्ये त्याने एक लाख पर्यंत आकडे मोजले होते. यासाठी मला ४४ तास लागल्याचे जिमीने बिझनेस इनसायडरला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. (सर्व फोटो : Facebook/ryansworldofficial, Twitter/MrBeastYT वरुन तसेच सोशल नेटवर्किंगवरुन साभार)

VIDEO: कबूतरखाना बंद झाला पण हे पक्ष्यांना कसं सांगणार? दादरमध्ये कबुतरखान्याजवळ प्रचंड संख्येनं येत कबुतरांनी काय केलं पाहा