-
सोशल मीडियामध्ये सध्या 'बेवफा चाय वाला' (Bewafa Chai Wala) चांगलाच चर्चेत आहे. हा चहावाला व्हायरल होण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्याचं मेन्यूकार्ड. इथे, पत्नीच्या त्रासाला वैतागलेल्या पत्नीपीडित पुरूषांना फ्रीमध्ये चहा भेटतो. याशिवाय मेन्यू कार्डमध्ये प्रेमात धोका मिळालेल्यांसाठी, प्रेमी जोडप्यांसाठी स्पेशल चहा असे अनेक पर्याय आहेत.
-
मेन्यू कार्डबाबत बोलायचं झाल्यास त्याच्याकडे सहा प्रकारांमध्ये चहा भेटतो. प्रत्येक चहासाठी वेगवेगळे दर आकारले जातात. सर्वात स्वस्त चहा प्रेमात धोका किंवा फसवणूक झालेल्यांसाठी आहे. त्याची किंमत केवळ 5 रुपये आहे.
-
आपण असं म्हणू शकतो की ग्राहकाच्या मूडनुसार 'कालू बेवफा चाय' वाल्याकडे चहा भेटतो. नवीन लग्न झालेलं असो किंवा प्रेमात फसवणूक झालेली असो, इथे परिस्थितीनुसार पाहिजे त्या प्रकारचा चहा ऑर्डर करता येतो.
-
बेवफा चहावाल्याच्या मेन्यूकार्डमध्ये 'मन चाहा प्यार' मिळवून देणाऱ्या चहाचा उल्लेखही आहे. हे ऑप्शन वाचून अनेक नेटकऱ्यांनी मिश्किलपणे हा जादूटोणा केलेला चहा असून पिताच लोकांना त्यांचं प्रेम भेटतं, असं म्हटलंय. पण तसं नसून एखाद्या व्यक्तीवर प्रभाव टाकायचा असेल तर हा चहा पाजावा, चहा पिल्यानंतर ती व्यक्ती तुमचीच होईल, असं 'कालू बेवफा चाय' वाल्याने सांगितलं.
-
मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यामध्ये हा अनोखा चहाचा स्टॉल असून स्वतःची प्रेमात फसवणूक झाल्यानंतर दिपक परिहार नावाच्या तरुणाने 'बेवफा चाय वाला' या नावाने चहाचा स्टॉल सुरू केलाय. या चहावाल्याकडील सर्वाधिक चर्चेत असलेला चहा म्हणजे इथे पत्नीच्या त्रासाला कंटाळलेल्या नवऱ्यांना मोफत चहा मिळतो. पण, यासाठी पत्नीला घेऊ चहावाल्याकडे जाऊन 'डेमो' दाखवावा लागतो. सध्या सोशल मीडियावर या अनोख्या चहावाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

BJP New Woman President : भाजपाला मिळणार पहिली महिला राष्ट्रीय अध्यक्ष? निर्मला सीतारमण यांच्यासह ‘ही’ दोन नावे शर्यतीत