-
भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याच्या पत्नी हसीन जहाँ यांच्यातील वाद तर आता जगजाहीर आहे. हसीन जहाँने मोहम्मद शमीवर मॅच फिक्सिंगपासून ते घरगुती हिंसाचारापर्यंत अनेक गंभीर आरोप केले आहेत.
-
कोलकातामधील एका न्यायालयाने तर मोहम्मद शमीवर खटलाही दाखल केला आहे. मोहम्मद शमीपासून वेगळं झाल्यानंतर हसीन जहाँ सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह झाली आहे.
-
नुकतीच हसीन जहाँने भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणच्या मुलाच्या वाढदिवसाला हजेरी लावली होती. त्याचे काही फोटोही तिने सोशल नेटवर्किंगवरुन शेअर केले आहेत.
-
इरफान पठाणचा मुलगा इमरानचा शनिवारी म्हणजेच १९ डिसेंबर रोजी वाढदिवस होता. या बर्थ डे पार्टीला हसीन जहाँनेही हजेरी लावली होती.
-
यावेळी हसीन जहाँने इरफानला काही प्रश्नही विचारले आणि त्याची इरफानने अगदी हलक्यापुलक्या स्टाइलने उत्तरही दिली.
-
हसीन जहाँने कार्यक्रमातील काही फोटो पोस्ट केलेत त्यात ती सुद्धा काहीतरी बोलताना दिसत आहे.
-
हसीन जहाँने या कार्यक्रमातील काही फोटो शेअर केलेत. यामध्ये हसीन जहाँनसोबतच इरफान, त्याचा मुलगा इमरान आणि पत्नीही दिसत आहे.
-
मात्र हसीन जहाँ सध्या फोटोवरुन ट्रोल होताना दिसत आहे.
-
हसीन जहाँने इन्स्ताग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये इरफानच्या नावाचं स्पेलिंग चुकीचं लिहिलं आहे. तिने इरफान पठाणचं अडनाव चुकवलं आहे.
-
अनेकांनी यावरुन हसीन जहाँला ट्रोल केलं आहे. तिला नाव नीट लिहिण्याचा सल्ला अनेकांनी दिलाय.
-
यापूर्वीही हसीन जहाँने शेअर केलेल्या न्यूड फोटोवरुन ती ट्रोल झाली होती. हा फोटो शेअर करताना हसीन जहाँ मोहम्मद शमीवर निशाणा साधला होता. “काल तू काहीच नव्हतास तेव्हा मी शुद्ध होती. आज तू काहीतरी झाला आहेस त मी अशुद्ध झाली. असत्याचा पडदा टाकून सत्य लपवलं जाऊ शकत नाही. मगरीचे अश्रू काही दिवसांसाठीच सोबत देतात,” असं हसीन जहाँने पोस्टमध्ये लिहिलं होतं.
-
मात्र या पोस्टमधील फोटो हा अनेकांना फारसा पटला नव्हता. त्यामुळे आपण एका नावाजलेल्या क्रिकेटपटूची पत्नी असून याचे तरी भान हसीन जहाँने बाळगावे असं मत अनेकांनी व्यक्त केलं होतं. आता हसीन जहाँ एका स्पेलिंग मिस्टेकमुळे ट्रोल होताना दिसत आहे. (फोटो : फाइल फोटो तसेच hasinjahanofficial या इन्स्ताग्राम अकाऊंटवरुन साभार)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल