-
करोनामुळे एकीकडे अनेकांनी आपलं लग्न पुढे ढकललं तर काही जणांनी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाहसोहळा पार पाडण्याला पसंती दर्शवली. सोशल डिस्टन्सिंगच्या काळातही मलेशियात मात्र एका दांपत्याने लग्नासाठी १० हजार पाहुण्यांना निमंत्रण दिलं होतं. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (Photos: Facebook/ Tengku Adnan Tengku Mansor)
-
बीबीसीच्या वृत्तानुसार, नवरामुलगा हा मलेशायितील एका प्रसिद्ध राजकारण्याचा मुलगा असून लग्नासाठी त्याने १० हजार पाहुणे बोलावले होते.
-
क्वालालंपूरपासून जवळच हा विवाहसोहळा पार पडला.
-
रविवारी सकाळी नवविवाहित दांपत्य सरकारी इमारतीबाहेर पाहुण्यांकडून शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित होते.
-
सर्व पाहुणे आपल्या गाड्या घेऊन आले होते. गाडीची काच खाली करुन सर्व जण हात हलवत नवदांपत्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत होते.
-
मलेशियात करोनाची दुसरी लाट आलेली असतानाही या लग्नामध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं सर्रासपणे उल्लंघन करण्यात आलं.
-
लग्नाचे फोटो कुटुंबीयांकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून चांगलेच व्हायरल झाले आहेत.
-
यावेळी त्यांनी कोणीही कारमधून खाली न उतरता करोनाच्या नियमांचं पालं केल्याचं म्हटलं आहे.
-
जवळपास तीन तास हा विवाहसोहळा सुरु होता. पाहुण्यांना यावेळी जेवण पॅकिंग करुन देण्यात आलं होतं.
-
नवऱ्यामुलाच्या वडिलांना भ्रष्टाचाराच्या आरोपात दोषी जाहीर करत एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आल्याच्या एक दिवस आधीच हे लग्न पार पडलं.
-
मलेशियात सध्या ९३ हजार करोना रुग्ण आहेत.

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल