-
कोणीही व्यक्ती आपल्या जवळच्या व्यक्तीला खूश करण्यासाठी गिफ्ट देत असते. पण, प्रेयसीला खूश करण्यासाठी दिलेलं एक गिफ्ट एका प्रियकराला चांगलंच महागात पडलं असून यापुढे कोणाला गिफ्ट देताना तो शंभरवेळेस तरी विचार करेल.
-
ख्रिसमिसच्या निमित्ताने अमेरिकेत एका प्रियकराने त्याच्या प्रेयसीला खास गिफ्ट देण्याचा विचार केला, पण त्या गिफ्टमुळे गर्लफ्रेंडच्या कुटुंबातील ३० वर्षे जुनं गुपीत उलगडेल याचा त्याने कधी साधा विचारही केला नव्हता.
-
बॉयफ्रेंडने Reddit या सोशल मीडियावर आपला हा अनुभव सांगितलाय. ख्रिसमिसच्या निमित्ताने प्रेयससीसाठी त्याने डीएनए टेस्टिंग किट खरेदी केली, पण या किटने त्याच्या गर्लफ्रेंडचं सगळं आयुष्यच बदलून गेलं.
-
प्रियकराने दिलेल्या डीएनए किटद्वारे त्याच्या प्रेयसीने टेस्ट केली, त्यानंतर जो रिझल्ट आला त्यातून तरुणीच्या कुटुंबात अजून एक मुलगी अर्थात स्वतःला सावत्र बहिण असल्याचं तिला समजलं. यामुळे हैराण झालेल्या तरुणीने थेट आईला फोन लावला.
-
आईला फोन लावून या तरुणीने मला कोणी सावत्र बहिण आहे का अशी विचारणा केली. पण, त्यावर आईने स्पष्टपणे नकार दिला.
-
नंतर फोन ठेवण्याआधीच या तरुणीने आईला जॉन स्मिथ नावाच्या कोणाला ओळखते का अशी विचारणा केली आणि तिच्या या प्रश्नावर मात्र आई पार चक्रावून गेली.
-
कारण, तरुणीच्या सावत्र बहिणीच्या पित्याचं नाव जॉन स्मिथ असल्याचं डीएनए टेस्टमधून समोर आलं होतं.
-
मुलीने अचानक अशाप्रकारे विचारणा केल्यामुळे तिची आई दोन मिनिट शांत झाली होती. काय बोलावं त्यांना काही कळत नव्हतं, पण अखेर तिच्या आईने इतर सर्वांपासून इतकं वर्ष लपवलेलं गुपीत सांगितलं.
-
याबाबत वडिलांशी काही बोलणं झालं का अशी विचारणा आईने केली. त्यावर मुलीने नाही असं उत्तर दिल्यावर आईने सर्व घटनाक्रम कथन केला.
-
'काही वर्षांपूर्वी मी आणि तुझे वडील एकमेकांपासून दूर राहत होतो. त्यावेळी काही दिवस मी एक्स बॉयफ्रेंड जॉन स्मिथ याच्यासोबत घालवले. नंतर परतल्यावर काही आठवड्यांनी गर्भवती असल्याचं लक्षात आलं आणि पोटातील बाळ देखील जॉनचं असल्याचं लक्षात आलं होतं…त्यामुळे याबाबत ३० वर्षे कोणासमोरही वाच्यता केली नाही', असा खुलासा तिच्या आईने केला. आईने केलेला धक्कादायक खुलासा एकून तरुणी मात्र पार हादरुन गेली. तिच्या बॉयफ्रेंडने दिलेल्या एका गिफ्टमुळे तिच्या आयुष्यात जणूकाही भूकंप आलाय. ( सर्व संग्रहित छायाचित्र )

“एका महाराष्ट्रीय ब्राह्मण मुलीने मुस्लीम पुरुषाशी लग्न…”, शबाना आझमींच्या वहिनी व सून दोघीही आहेत मराठी