-
ट्रॅफिक सिग्नल म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येतात तीन रंग लाल, हिरवा आणि पिवळा. पिवळ्या किंवा चंदेरी रंगाच्या खांबावर गोल रंगाचा ट्रॅफिक सिग्नल आपल्या सर्वांच्या परिचयाचा झालाय. मात्र आता हा सिग्नलचा साचेबद्दल लूक बदलणार आहे. मुंबईमध्ये प्रयोगिक तत्वावर या बदलला सुरुवात झालीय. याच नव्या लूकमधील सिग्नलचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झालेत.
-
मुंबईतील वरळी सी फेसवर पूर्णपणे एलईडी लाईट्स असणारे सिग्नल लावण्यात आलाय. म्हणजे खांबावर ज्या रंगाचा सिग्नल लागला असेल त्या रंगाच्या एलईडी लाइट्स संपूर्ण खांबावर चमकतील.
-
मुंबई महानगरपालिकेने हा प्रयोग हाती घेतला असून सध्या एकाच सिग्नलवर हे एलईडी लाईट्स लावण्यात आलेत.
-
दोन जानेवारीपासून हा सिग्नल कार्यरत झाला असून त्याचे फोटो व्हायरल होत आहेत.
-
हा चमकणाऱ्या एलईडी लाइट्सचा खांब असल्याने कोणता सिग्नल लागलाय हे चालकांना अगदी दूरनही कळू शकेल. तसेच सिग्नल लाईट्सची दृष्यमानता वाढेल असं सांगण्यात येत आहे.
-
सिग्नलच्या लाईट्स स्पष्टपणे दिसण्याबरोबरच हे सिग्नल शहराच्या सौंदर्यामध्ये भर घालणारे आहेत असंही सांगितलं जात आहे. (सर्व फोटो : Twitter/saileshvora55 वरुन तसेच Youtube/Mumbai Meri jaan चॅनेलवरुन स्क्रीनशॉर्ट साभार)

मारिया कोरिना मचाडो यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना का समर्पित केला शांततेचा नोबेल पुरस्कार? म्हणाल्या, “व्हेनेझुएलाच्या पीडितांना…”