-
तुम्ही ऑफिसमध्ये काम करत आहात आणि अचानक तुम्हाला 'निसर्गाच्या हाक देण्याची इच्छा' झाली. मात्र कंपनीच्या नियमांमुळे तुम्हाला प्रसाधनगृहामध्ये जाण्यास बंदी असेल तर तुम्ही काय कराल? काही सुचत नाही ना.
-
खरं तर ही कल्पना असली तरी चीनमधील एका कंपनीचे हेच धोरण सध्या जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. चीनमधील एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी हा विचित्र नियम केला आहे. या कंपनीने आठ तासांच्या शिफ्ट दरम्यान केवळ एकदा प्रसाधनगृहांचा वापर करण्याची परवानगी दिली आहे.
-
म्हणजेच आठ तासांच्या शिफ्टमध्ये कोणत्याही कर्मचाऱ्याने एकाहून अधिक वेळा प्रसाधनगृहाचा वापर केल्यास त्याच्याकडून दर फेरीसाठी दंड आकरण्यात येतो.
-
कोणालाही चीड येईल असा हा नियम लागू करणाऱ्या कंपनीचं नाव आहे अपनू इलेक्ट्रिक सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजी. गुआंगडॉग राज्यातील डॉन्ग गुआंग येथे असणाऱ्या या कंपनीचा हा जगावेगळा नियम सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेत आहे. अनेकांनी कंपनीच्या या धोरणावर कठोर शब्दात टीका केलीय.
-
आम्ही वन डे वन टॉयलेट ब्रेक हे धोरण कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी लागू केलं आहे, अशी कबुली कंपनीने दिली आहे.
-
या नव्या नियमाअंतर्गत एकापेक्षा जास्त वेळा ऑफिसमधील प्रसाधनगृहाचा वापर करणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक फेरीसाठी २० युआन म्हणजेच तीन डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार २२० रुपये दंड केला जात आहे.
-
आपलं काम टाळण्यासाठी कारण नसताना टॉयलेट ब्रेकच्या नावाखाली टाइमपास करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धडा शिकवण्याच्या उद्देशाने कंपनीने हा निर्णय घेतल्याचे साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.
-
कंपनीने जारी केलेली ही दिवसातून एकदाच प्रसाधनगृहाचा वापर करण्याची नोटीस कंपनीतील काही कर्मचाऱ्यांनी सोशल नेटवर्किंगवर पोस्ट केलीय आहे. त्यानंतर अनेकांनी या नियमाचा विरोध केला आहे.
-
कंपनीतील अंतर्गत नोटीस ही सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी कंपनी प्रशासनाने २० आणि २१ डिसेंबर रोजी सात कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं.
-
मात्र ही नोटीस सोशल नेटवर्किंगवर पोस्ट करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांवर अशा जाचक अटी घातल्याने कंपनीवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. तरी कंपनीने आपल्या वन डे वन टॉयलेट ब्रेक या निर्णयावर ठाम आहे.
-
अनेक कर्मचारी हे आपल्या जबाबदाऱ्या टाळण्यासाठी आणि काम टाळण्यासाठी टॉयलेट ब्रेकच्या नावाखाली कार्यालयीन वेळ फूकट घालवतात, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.
-
आमच्याकडे काहीच पर्याय शिल्लक न राहिल्याने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. कंपनीतील अनेक कर्मचारी हे कामाचा आळस करतात. यासंदर्भात कंपनीला काहीतरी ठोस निर्णय घेणं आवश्यक होतं, असं कंपनीचे प्रवक्ते म्हणालेत.
-
दिलेलं काम टाळण्यासाठी ते टॉयलेट ब्रेकचा वापर करतात आणि शिफ्टमधील वेळ फूकट घालवतात, असा दावाही कंपनीच्या प्रवक्त्यांनी केलाय.
-
कंपनी प्रशासनाला कर्मचाऱ्यांच्या या टॉयलेट ब्रेक मागील खरं कारण समजल्यानंतर अनेकदा यासंदर्भात चर्चा करण्यात आली. मात्र त्यानंतरही कर्मचाऱ्यांच्या वागणुकीमध्ये फरक पडला नाही.
-
कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार काम करत नाही म्हणून एखाद्याला कामावरुन काढून टाकण्यापेक्षा नवे कठोर नियम करणे आणि त्यासाठी दंड करणे अधिक चांगला पर्याय आहे.
-
जे कर्मचारी एकाहून अधिक वेळा प्रसाधनगृहाचा वापर करतात त्यांना तातडीने म्हणजेच दैनंदिन आधारावर दंड केला जात नाही.
-
एकाहून अधिक वेळा प्रसाधनगृहाचा वापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी असं किती वेळा केलं याचा महिन्याचा हिशेब ठेवला जातो. त्यानंतर हे पैसे त्यांच्या महिन्याच्या पगारातून कापले जातात.
-
एकाहून अधिक वेळा प्रसाधनगृहामध्ये जाणाऱ्या कर्मचाऱ्यांन बॉसच्या केबिनजवळ ठेवलेल्या रजिस्टरमध्ये नाव नोंदवल्यानंतरच प्रसाधनगृहाचा वापर करता येतो.
-
प्रसाधनगृहांसंदर्भातील हा नियम जाचक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. हे अमानवीय असून कर्मचाऱ्यांना गरजेप्रमाणे प्रसाधनगृह वापरण्याची परवानगी द्यायला हवी असं मत या नियमाचा विरोध करणाऱ्यांनी व्यक्त केलं आहे.
-
तर अनेकांनी कंपनीचं धोरण योग्य असून चांगल्या मार्गाने कर्मचाऱ्यांना समजत नसेल तर अशी सक्ती केल्याशिवाय त्यांना कामाचं गांभीर्य कळणार नाही असं म्हणत कंपनीची बाजू घेतलीय. (फोटो : इंडियन एक्सप्रेस, पिक्साबॉय, विकिपिडिया आणि सोशल नेटवर्किंगवरुन)

मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”