-
अमेरिकेतील सॅनफ्रॅन्सिस्कोमध्ये राहणाऱ्या एका तरुणासोबत असा काही विचित्र प्रकार घडला आहे की तो याबद्दल खुलेपणे कबुलीही देऊ शकत नाही आणि ती गोष्ट लपवून ठेवणंही त्याला जमणार नाही.
-
झालं असं की या तरुणाने काही वर्षांपूर्वी सात हजार २ आभासी चलन म्हणजेच बिटकॉइन्स घेऊन ठेवले. ज्यावेळी या तरुणाने हे बिटकॉइन्स विकत घेतले तेव्हा त्यांना फारशी किंमत नव्हती.
-
त्यामुळेच या तरुणाने विकत घेतलेले हे बिटकॉइन्स आपल्या डिजिटल वॉलेटमध्ये ठेवले. मात्र नंतर तो या वॉलेटचा पासवर्ड विसरला.
-
कालांतराने बिटकॉन्सची किंमत वाढत गेली आणि त्याने एकेकाळी विकत घेतलेल्या सात हजार बिटकॉइन्सची आजच्या घडीला अंदाजे किंमत आहे तब्बल एक हजार ७०० कोटी रुपये. (२० मिलियन युरो)
-
मात्र या तरुणाकडे पासवर्डच नसल्याने तो त्याच्याच मालकीचा हा पैसा वापरु शकत नाही, अशी त्याची गोची झाली आहे.
-
या तरुणाचे नाव आहे स्टीफन थॉमस. स्टीफन हा स्वत: एक प्रोग्रामर आहे. (फोटो : youtube/CoinDesk वरुन साभार)
-
न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार स्टीफनने आपले बिटकॉन्स ठेवण्यासाठी जे डिजिटल वॉलेट वापरले आहे ते ओपन करण्यासाठी पासवर्ड हा एकमेव पर्याय आहे.
-
स्टीफन या पासवर्डच्या मदतीने त्याची छोटी हार्डड्राइव्ह अॅक्सेस करु शकेल. या हार्डड्राइव्हला आर्यन की असं म्हणतात.
-
यामध्येच त्या खासगी डिजिटल वॉलेटची खासगी की म्हणजेच पासवर्ड आहे ज्यामध्ये स्टीफनने बिटकॉन्स ठेवले आहेत.
-
आता स्टीफनला केवळ पासवर्ड आठवला तरी तो अब्जाधीश होईल.
-
स्टीफनने बिटकॉन विकत घेऊन या हार्डड्राइव्हचा पासवर्ड म्हणजेच आर्यन कीचा पासवर्ड एका कागदावर लिहिला होता.
-
दरम्यानच्या काळामध्ये अनेक देशांमध्ये बिटकॉन्सविरोधात भूमिका घेतला. त्यामध्ये मध्यंतरी बिटकॉन्सचे दर गडगडल्याने स्टीफनला बिटकॉन्सचा विसर पडला. दरम्यानच्या काळात त्याने ज्या कागदावर पासवर्ड लिहून ठेवला होता तो सुद्धा हरवला.
-
एकदा बिटकॉन्ससंदर्भात वाचत असताना अचानक स्टीफनला या जुन्या खरेदीची आठवण झाली. त्याने संपूर्ण घरामध्ये हा पासवर्ड लिहिलेला कागद शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला तो कागद काही सापडला नाही.
-
यात अजून एक अडचण अशी आहे की स्टीफन ही आर्यन की ओपन करण्यासाठी केवळ दहा ट्राय करु शकतो. यामध्ये त्याला ती ओपन करता आळी नाही तर हे वॉलेट कायमचं सील होईल.
-
आतापर्यंत स्टीफनने आठवेळा पासवर्ड वापरुन ही आर्यन की ओपन करण्याचा प्रयत्न केला मात्र नेहमी त्याला अपयश आलं आहे. त्यामुळे आता बिटकॉन्स मिळवण्यासाठी त्याच्याकडे दोनच संधी आहेत.
-
म्हणजेच दोन संधींमध्येही स्टीफनने चुकीचा पासवर्ड टाकून लॉगइन करण्याचा प्रयत्न केला आणि तो पासवर्ड चुकला तर त्याचं हे डिजिटल वॉलेट कायमचं बंद होईल आणि त्याला एक हजार ७०० कोटींपैकी एक रुपयाही मिळणार नाही.
-
सध्या जगामध्ये बिटकॉइनसंदर्भात कोणतीही नियंत्रक संस्था अस्तित्वात नाहीय. त्यामुळे पासवर्ड पुन्हा बनवण्यासारखा कोणताच पर्या उपलब्ध नाहीय.
-
बिटकॉइन हे आभासी चलन तयार करणारी व्यक्तीही कोण आहे हे कोणास ठाऊख नाही. सातोषी नाकामोटो नावाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या व्यक्तीने बिटकॉइन्स बनवण्याचे सांगितले जातं.
-
डिजिटल खातं सुरु करुन बिटकॉनइन्सचा व्यवहार करता यावा. यावर कोणत्याही देशातील सरकारची मालकी नसेल अशी बिटकॉइन्सची मूळ संकल्पना आहे. मात्र बिटकॉइन्सला अनेक देशांमध्ये विरोध असून यासंदर्भातील नियमच नसल्याने अनेक देशांमध्ये बिटकॉन्स व्यवहारांवर बंदी आहे.
-
वॉलेट रिकव्हरी सेवा देणाऱ्या चेनालिसिसने दिलेल्या माहितीनुसार जगामध्ये एक कोटी ८५ लाख बिटकॉइन्स आहेत.
-
बिटकॉइन्सच्या नादत लोकांनी आत्तापर्यंत २० टक्के बिटकॉइन्स म्हणजेच १० लाख कोटी रुपये कायमचे गमावले आहेत. (फोटो : रॉयटर्स आणि पिक्साबेवरुन)

Maharashtra Monsoon Updates : मान्सूनचा प्रवास आजपासून रखडणार! इंग्लंडमधील हवामान तज्ज्ञांनी सांगितले कारण…