-
अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाने टेस्ला आणि स्पेसएक्स यांसारख्या दिग्गज कंपन्यांचे संस्थापक एलन मस्क यांना एक विनंती केली आहे. एलन मस्कने असं सोशल मीडिया अॅप बनवावं जिथे त्याच्या वडिलांना बंदीच्या कारवाईचा सामना करावा लागणार नाही असं ज्युनियर डोनाल्ड ट्रम्पचं म्हणणं आहे.
-
ट्रम्प समर्थकांनी कॅपिटॉल बिल्डिंग परिसरात केलेल्या हिंसाचारानंतर सोशल मीडियातील दिग्गज कंपन्यांकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कारवाई सुरू आहे. जवळपास सर्वच मोठ्या कंपन्यांनी ट्रम्प यांचं अकाउंट आपल्या प्लॅटफॉर्मवर बॅन केलंय. ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट आणि युट्यूब यांसारख्या अनेक कंपन्यांनी ट्रम्प यांच्या अकाउंटवर बंदी घातलीये.
-
"एलन मस्क यांनी अंतराळाबाबत उत्तम काम केलंय, त्यांनी हे काम स्वतःच्या जीवावर केलं, मोठमोठ्या सरकारपेक्षा त्यांनी हे काम कमी खर्चात आणि चांगल्या प्रकारे करुन दाखवलंय. मग एलन मस्क एखादं सोशल मीडिया अॅप का बनवत नाहीत?", असं ट्रम्प यांच्या मुलाने इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करुन म्हटलंय.
-
पुढे बोलताना ट्रम्प ज्युनियरने , "मी पुराणमतवादी इको चेंबर शोधत नाहीये. तर, मला एखादा असा प्लॅटफॉर्म हवाय जिथे मी आपले विचार दुसऱ्या विचारधारेच्या लोकांसोबत शेअर करु शकतो. जिथे आम्हाला नियंत्रीत केलं जाईल आणि दबाव आणला जाईल असा प्लॅटफॉर्म नकोय. एलन तू एखादा असा प्लॅटफॉर्म का नाही बनवत?? प्लीज एखादी चांगली कन्सेप्ट घेऊन ये. मला वाटतं एलन मस्क असा व्यक्ती आहे जो अमेरिकेत बोलण्याचं स्वातंत्र्य (फ्री स्पीच) वाचवू शकतो", असं म्हटलं.
-
दरम्यान, ट्रम्प यांच्या मुलाने केलेल्या विनंतीवर एलन मस्क यांच्याकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. पण सोशल मीडियावर हा विषय सध्या चांगलाच चर्चेत आलाय.

तब्बल ५०० वर्षांनंतर शनिदेवांची मोठी चाल! ‘या’ ३ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडणार, करिअर आणि व्यवसायात होणार प्रगती