-
सगळा देश ज्या गोष्टीची चातकासारखी वाट बघत होता, ती अखेर आली. अनेक महिन्यांपासूनची प्रतीक्षा संपली. केंद्र सरकारने दोन कोविड लसींच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिल्यानंतर लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला. लस आल्याचा आनंद रुग्णालयांच्या परिसरात दिसून येत होता. निराशेचं मळभ दूर होऊन रुग्णालयांची प्रागंण रांगोळ्यांनी सजले होते. (Photo/Pavan Khengre)
-
कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं लसीकरणाच्या प्रक्रियेला वेग दिला होता. ड्राय रन झालेला असल्यानं सज्ज झालेली रुग्णालये लसीकरणाची जणू वाट बघत होते. (Photo/Pavan Khengre)
-
महाराष्ट्रातील सर्वच रुग्णालयात गोंधळ न होता शिस्तबधपणे लसीकरणाची प्रक्रिया पार पडावी यासाठी ठिकठिकाणी सूचना लावण्यात आल्या होता. (Photo/Pavan Khengre)
-
ही प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र लसीकरण केंद्र तयार करण्यात आली होती. (Photo/Pavan Khengre)
-
कोविड योद्ध्यांना लस देण्यासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आले होते. या ठिकाणीच आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. (Photo/Amit Chakrabarty)
-
रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापासूनच लसीकरणासाठी स्वतंत्र व्यवस्था तयार करण्यात आली होती. (Photo/Pavan Khengre)
-
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात आली. यावेळी आवश्यक कर्मचारी वर्गही नियुक्त करण्यात आलेला होता.(Photo/Amit Chakrabarty)
-
लसीकरणाला ११ वाजता सुरू होणार असली, तरी सकाळपासूनच लसीकरण केंद्र असलेल्या रुग्णालयांमध्ये लगबग सुरू होती. (Photo/Narendra Vaskar)
-
लस घेण्यासाठी येणाऱ्या कोविड योद्ध्यांना बसण्यासाठी प्रतीक्षा कक्ष तयार करण्यात आले होते. (Photo/Arul Horizon)
-
लसीकरणाची तयारी झालेली असली, तरी प्रत्येक रुग्णालयातील कर्मचारी काही राहिलं तर नाही ना? असं म्हणत पुन्हा पुन्हा सर्व गोष्टींवर नजर टाकत होते. (Photo/Amit Chakrabarty)
-
डॉक्टरांसह सर्वच कर्मचाऱ्यांवर वेगवेगळ्या स्वरूपाची जबाबदारी देण्यात आलेली असल्यानं तयारी झाली की नाही, याचा आढावा घेण्यासाठी शुभारंभापूर्वी धावपळ सुरू होती. (Photo/Amit Chakrabarty)
-
लस घेण्यासाठी येणाऱ्या कोविड योद्ध्यांच्या मनातील पुसटशी दूर करण्यासाठी आरोग्य परिचारिकांनी आगळंवेगळं स्वागत करून त्यांच्या उत्साह वाढवला. (Photo/Amit Chakrabarty)
-
अखेर ती सुवर्ण वेळ झाली. १०.३० वाजले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरण मोहिमेची सुरूवात करण्यापूर्वी देशाला संबोधित केलं. सगळ्यांचं अभिनंदन केलं आणि उत्साहही वाढवला. (Photo/Arul Horizon)
-
पंतप्रधानांचं संबोधन ऐकण्यासाठी लसीकरण केंद्रावर खास व्यवस्था करण्यात आली होती. (Photo/Arul Horizon)
-
रुग्णालयांमध्ये लस देण्यासाठीची लगबग सुरू होती. तर रुग्णालयाबाहेर लस घेण्यासाठी आलेले कोविड योद्धे प्रतीक्षा करत होते. (Photo/Amit Chakrabarty)
-
वेगवेगळ्या लसीकरण केंद्राबाहेर अशा पद्धतीने सोशल डिस्टन्सिगचं पालन करत कोविड योद्धे लस घेण्यासाठी हजर झाले. (Photo/Amit Chakrabarty)
-
ज्या कोविड योद्ध्यांना लस देण्यात आली, त्यांना याची माहिती अगोदरच देण्यात आलेली होती. (Photo/Amit Chakrabarty)
-
११ वाजता प्रतीक्षा संपली… लाभार्थी प्रतीक्षा कक्षात आले. शुभारंभ असल्यानं मोजक्याचं कोविड योद्ध्यांना बोलावण्यात आलेलं होतं. (Photo/Arul Horizon)
-
यात डॉक्टरांसह नर्स आणि पॅरामेडिकलच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. (Photo/Narendra Vaskar)
-
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचा प्रारंभ झाल्यानंतर नावाची खातरजमा करून घेत लसीकरणासाठी सोडण्यात येऊ लागलं. (Photo/Arul Horizon)
-
लसीकरणासाठी सोडतानाही हाताला सॅनिटायझर आणि स्क्रिनिंग केलं जात होतं. (Photo/Pavan Khengre)
-
प्रत्येक लसीकरण केंद्रावर मग कोविड योद्ध्यांना लस टोचण्यात आली. (Photo/Narendra Vaskar)
-
यात आरोग्य सेवेतील वेगवेगळे अधिकारी आणि कर्मचारी याचा समावेश होता. (Photo/Arul Horizon)
-
कोविड लसीचा हा पहिला डोस असून, एका महिन्यानंतर या कर्मचाऱ्यांना पुन्हा दुसरा डोस दिला जाणार आहे. (Photo/Arul Horizon)
-
कर्मचाऱ्यांच्या लसीकरणावेळी रुग्णालयांमध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात आली. (Photo/Arul Horizon)
-
भारतात लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ३ कोटी लोकांना लस दिली जाणार आहे.(Photo/Arul Horizon)
-
त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ३० कोटी नागरिकांना करोनाची लस देण्यात येणार आहे. (Photo/Arul Horizon)
-
पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये एका महिन्याचं अंतर असणार असून, दुसरा डोस घेतल्यानंतर २ आठवड्यांनी शरीरात करोना प्रतिबंधात्मक शक्ती निर्माण होणार असल्याचं स्वतः पंतप्रधानांनी लसीकरण मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी स्पष्ट केलं. (Photo/Deepak joshi)

आज गणेश चतुर्थीला ‘या’ ३ राशींवर गणपती बाप्पाची विशेष कृपा! अचानक धनलाभ तर आयुष्यातील अडचणी अखेर होतील दूर