-
आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश यांची नोंद वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
-
आयर्न मॅन खिताब पटकावल्याप्रकरणी ही नोंद करण्यात आली आहे.
-
ही कामगिरी करणारे देशातील पहिले अधिकारी होण्याचा मान त्यांना मिळालाआहे.
-
सरकारी कर्मचारी, सशस्त्र सेना, निमलष्करी दल, सनदी अधिकारी यांच्यातील वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणारे कृष्णप्रकाश हे पहिलेच अधिकारी ठरले आहेत.
-
२०१७ मध्ये कृष्णप्रकाश यांनी Ironman Triathlon ही स्पर्धा जिंकली होती.
-
जगातील अत्यंत खडतर स्पर्धा म्हणून याकडे पाहिलं जातं.
-
स्पर्धकाला १६ ते १७ तासांमध्ये ही स्पर्धा पूर्ण करायची असते.
-
यामध्ये सर्वप्रथम ३.८ किलोमीटर पोहणे, १८०.२ किलोमीटर सायकलिंग आणि ४२.२ किलोमीटर धावणे असे खडतर टप्पे असतात.
-
फ्रान्समध्ये झालेल्या या स्पर्धेत २०१७ मध्ये विजेता होण्याचा मान कृष्णप्रकाश यांच्या नावावर झाला होता.
-
पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी बुधवारी सकाळी ट्विटरला आपली नोंद वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाल्याची माहिती दिली.
-
कृष्णप्रकाश यांनी ट्विटरला फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्यांना प्रमाणपत्र दिलं जात असल्याचं दिसत आहे.
-
कृष्णप्रकाश यांनी फोटो शेअर केल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
-
अभिनेता सुनील शेट्टीनेही कृष्णप्रकाश यांचं अभिनंदन केलं असून तुमच्या यशासाठी फार आनंदी असून दुसरं कोणीही यासाठी पात्र असू शकत नाही असं म्हटलं आहे.
-
कृष्णप्रकाश यांच्याव्यतिरिक्त अभिनेता मिलिंद सोमण, आयपीएस अधिकारी रविंद्रकुमार सिंगल यांनीही ही खडतर स्पर्धा जिंकली आहे.
-
(All Photos: Instagram)

“ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब हयात असतानाच २८८ आमदार आले असते”, शिंदे गटाच्या आमदाराचं वक्तव्य