-
भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी बुधवारी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. वॉशिग्ट डीसीमध्ये सुरू असलेला शपथविधी सोहळा दिल्लीत बसलेली एक व्यक्ती डोळ्यात साठवून घेत होती, त्या व्यक्तीचं नाव म्हणजे गोपालन भालचंद्रन! भालचंद्रन कमला हॅरिस यांचे मामा आहेत. ते दिल्लीतील मालवीय नगरमध्ये राहतात. हॅरिस यांनी उपराष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारली त्यावेळी भालचंद्रन यांनी त्यांना आईने दिलेल्या शिकवणीची आठवण करून दिली. (छायाचित्र/एपी)

"आम्हाला तिचा अभिमान आहे. तिच्या आईलाही तिचा अभिमान वाटला असता. तिच्या आईने तिला जे शिकवलं आहे, तेच तिनं करत राहावं, याशिवाय माझ्याकडे तिला सांगण्यासाठी काही सल्ला नाही. भालचंद्रन हे इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज् अॅण्ड अॅनालिसिस या संस्थेत कार्यरत आहेत. (छायाचित्र/कमला हॅरिस इन्स्टाग्राम)
-
यावेळी भालचंद्रन यांनी उपराष्ट्राध्यक्ष बनलेल्या कमला हॅरिस यांच्या तरुणपणातील आठवणींनाही उजाळा दिला. "कमलाला अनेक गुण तिची आई श्यामला हिच्याकडूनच मिळाले आहेत. कमला हॅरिस यांनी द ट्रूथ वुई होल्ड या आत्मचरित्रात आईविषयी लिहिलेलं आहे. 'राजकीय वातावरण आणि नैसर्गिकरित्या लोकांचं नेतृत्व करणाऱ्या घरातच माझ्या आई वाढली. तिने सांगितलेलं आहे की, पतीकडून छळ होणाऱ्या महिलांना तिची आजी कसे सल्ले द्यायची. तिच्या आईला आंदोलनांना घेऊन जायची," असं भालचंद्रन म्हणाले. (छायाचित्र/कमला हॅरिस इन्स्टाग्राम)
-
"मला माहिती आहे की, ती आम्हाला अभिमान वाटेल, असं काम करत राहिल. ती पुढच्या कार्यकाळात कदाचित अध्यक्षपदाची निवडणूकही लढवेल आणि जिंकेल, याची मला खात्री आहे," असा विश्वासही भालचंद्रन यांनी यावेळी व्यक्त केला. (छायाचित्र/कमला हॅरिस इन्स्टाग्राम)
-
४९व्या उपाध्यक्ष म्हणून कमला देवी हॅरिस यांनी बुधवारी स्थानिक वेळेनुसार दुपारच्या प्रहरी आपापल्या पदांची शपथ घेतली (छायाचित्र/कमला हॅरिस ट्विटर)
-
६ जानेवारी रोजी ट्रम्प यांच्या गुंडांनी ज्या इमारतीवर विकृत हल्ला चढवला, त्याच इमारतीत पार पडलेला हा सोहळा लोकशाहीप्रेमींसाठी आश्वासक ठरला. (छायाचित्र/एपी)
-
अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी बायडेन यांना, तर अमेरिकी सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या लॅटिन-वंशीय न्यायमूर्ती सोनिया सोटोमायर यांनी कमला हॅरिस यांना शपथ दिली. (छायाचित्र/कमला हॅरिस ट्विटर)

देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे, तरीही…”