-
नवरा-बायकोचं नातं अत्यंत पवित्र मानलं जातं. परंतु बर्याचदा तिसऱ्या व्यक्तीच्या येण्याने हे नातं तुटतं किंवा नको तेवढा दुरावा निर्माण होतो. विवाहबाह्य संबंधाची अशीच एक घटना समोर आली असून पत्नीने आपल्या पतीला त्याच्या प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडलंय.
-
एका मंदिराबाहेर कार उभी करुन आपल्या प्रेयसीला प्रेमाने मसाला डोसा भरवत असतानाच एका पतीला त्याच्या पत्नीने रंगेहाथ पकडलं.
-
पत्नीसोबत तिचा भाऊ देखील होता. अचानक आलेल्या मेव्हण्याला आणि पत्नीला बघून पतीची धांदल उडाली.
-
तिथेच दोघांमध्ये बरीच बाचाबाची झाली. नंतर पत्नीने भावाच्या मदतीने पतीला आणि त्याच्या प्रेयसीला गाडीबाहेर काढलं व पोलीस स्थानकात घेऊन गेले.
-
पोलिस स्थानकात गेल्यावर महिलेने पतीचे एका महिलेसोबत नव्हे तर अनेक महिलांसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला.
-
उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली असून रंगेहाथ पकडलेला पती राज्य सरकारी कर्मचारी (ज्युनियर इंजिनयर) म्हणून कार्यरत आहे.
-
मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडल्याचं समजतंय. पती कारमधून त्याच्या प्रेयसीला घेऊन एका मंदिरात गेला. तिथे जवळच असलेल्या एका रेस्तराँमधून त्याने प्रेयसीसाठी मसाला डोसा आणला.
-
कारमध्ये बसून प्रेयसीसोबत मसाला डोसा खात असतानाच अचानक त्याची पत्नी भावाला घेऊन तिथे पोहोचली आणि पतीला रंगेहाथ पकडलं.
-
भावाच्या मदतीने पत्नीने पती आणि त्याच्या प्रेयसी दोघांनाही पोलिस स्थानकात नेलं, पण पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला आणि समज देऊन पतीला सोडून देण्यात आलं.
-
विवाहबाह्य संबंधांशी संबंधित असलेले आयपीसीचे कलम (४९७) तीन वर्षांपूर्वी २०१८ साली सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने रद्द केले. त्यामुळे विवाहबाह्य संबंध गुन्हा ठरत नाही. म्हणून तिची तक्रार दाखल करुन न घेता पतीला समज देऊन पोलिसांनी सोडून दिलं. (सर्व प्रातिनिधिक छायाचित्र)

मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”