-
मंगळवारी देशात करोनाचे दोन लाख ९४ हजार रुग्ण आढळून आले आहेत. अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांची कमतरता जाणवू लागली आहे. रेमडेसिवीर तसंच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर टाटा उद्योग समुहाने दोन दिवसांपूर्वीच पुढाकार घेत २००-३०० टन ऑक्सिजन मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र मंगळवारी पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवहानानंतर आता टाटा ग्रुपने थेट परदेशातून भारतीयांसाठी सुविधा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
टाटा ग्रुपने मोठ्या आकाराचे २४ ऑक्सिजन वाहक सिलेंडर्स आयात करण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन देण्यात आली आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सर्व नागरिकांना केलेलं आवाहन कौतुकास्पद आहे. आम्ही टाटा कंपनीकडून भारतातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी जे प्रयत्न शक्य आहेत ते सर्व करण्यास कटीबद्ध आहोत. ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी आम्ही असाच एक निर्णय घेतला आहे, असं ट्विट टाटा ग्रुपच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आलं आहे.
-
टाटा ग्रुपने द्रव्य स्वरुपातील ऑक्सिजनची देशभरामध्ये वाहतूक करण्यासाठी २४ मोठे कंटेनर आयात करण्याचा निर्णय घेतलाय.
-
देशावरील संकट काळात आम्ही देशासोबत आहोत असं कंपनीने म्हटलं आहे.
-
देश सध्या करोनाविरोधात देत असलेल्या लढ्यामध्ये आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आमचे हे प्रयत्न असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.
-
२००-३०० टन ऑक्सिजन मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची घोषणा टाटा कंपनीकडून करण्यात आली तेव्हापासूनच रतन टाटांवर कौतुकाचा वर्षाव होत असून त्यांना सोशल नेटवर्किंगवर अनेकांनी देवमाणूस असं म्हटलं आहे.
-
समाजसेवा ही टाटांच्या रक्तात आहे असंही काहींनी म्हटलं आहे.
-
काँग्रेस नेते भाई जगताप यांनीही रतन टाटांचा उल्लेख माणसातला देव असा केलाय.
-
काहींनी आम्ही देव पाहिला नसला तरी रतन टाटांच्या रुपात देव नक्की पाहिलाय असं म्हटलं आहे.
-
आता टाटा २४ कंटेनर आयात करणार असल्याचं समजल्यानंतर #ThisIsTata म्हणत अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे. या ट्विटमध्ये टाटांना जगातील सर्वात श्रीमंत माणूस म्हणत एकाने त्यांचं कौतुक केलं आहे.
-
टाटा म्हणजे भारत आणि भारत म्हणजे टाटा, असं एकाने म्हटलं आहे.
-
गरज असते तेव्हा टाटा कायमच मदतीला धावून येतात, असं निरिक्षण एकाने नोंदवलं आहे.
-
सर्वाधिक कमाई करणारा आणि दान देणारा म्हणत एकाने उद्योगपतींमधील फरक दाखवून दिलाय.
-
अनेकांनी टाटांचं कौतुक केलं आहे. काहींनी यापुढे केवळ टाटाच्याच गाड्या विकत घेणार असल्याचं म्हटलं आहे.
-
देशाचा कारभार रतन टाटा नावाच्या देवमाणसाच्या हाती द्यायला हवा म्हणजे आपण जास्त परिणामकारपणे काम करु, असं एकाने म्हटलं आहे.
-
काहींनी टाटा आणि मोदींची जोडी देशासाठी उत्तम असल्याचं म्हटलं आहे.
-
-
टाटा ही खरी भारतीय कंपनी असल्याचं काहींनी म्हटलं आहे.
-
टाटाच खऱे भारतीय असं अनेकांनी कमेंट करुन म्हटलं आहे.

दादरमध्ये झाड कोसळून ‘सलमान खान’ जखमी…