-
सध्या करोना लसीकरणासाठी अनेकजण गर्दी करताना दिसत आहेत. १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण सुरु करण्यात आलं असून लसींच्या उपलब्धतेप्रमाणे लसीकरण केलं जात आहे. असं असतानाच सोशल नेटवर्किंगवर लसीकरणासंदर्भातील एका तरुण मुलाचा लस घेताना फोटो वेगळ्याच कारणामुळे चांगलाच चर्चेत आलाय. जाणून घेऊयात नक्की काय आहे हे प्रकरण… (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य : पीटीआय)
-
तर हाच आहे तो व्हायरल झालेला फोटो. आता फोटो व्हायरल काय झालाय हे वेगळं सांगण्याची गरज नाही. अर्थात तुम्हालाही फोटो पाहिल्या पहिल्याच लस घेणाऱ्या मुलाची नजर लगेच लक्ष्य वेधून घेत आहे. त्यामुळेच हा फोटो व्हायरल झालाय. काहींनी याकडे गंमतीदार पद्धतीने पाहिलं आहे तर काहींनी हा बावळटपणा असून हा मुलगा नर्सला एका प्रकारे त्रास देत असल्याचं मत व्यक्त केलंय. नेटकऱ्यांमध्ये या फोटोवरुन मतमतांततरे आहेत. या फोटोबद्दल मजेदार आणि गंभीर कंमेंट्सचा पाऊस पडलाय. नेटकरी काय म्हणतायत याबद्दल पाहुयात… (सर्व फोटो ट्विटरवरुन साभार)
-
एक जण म्हणतोय मला लसीवर विश्वास नाही पण 'तेरी नज़रों ने दिल का किया जो हशर असर ये हुआ' असंच काहीतरी या मुलाच्या मनात झालं असणार.
-
एका महिलेने हा फोटो ट्विट करत त्याला मेन विल बी मेन ही कॅप्शन दिलीय. पुरुष हे कधीच सुधरणार नाही अशा अर्थाची एक जाहिरात असून त्यामधील हे वाक्य आहे.
-
याच जाहिरातीमधील पुढील कडवंही हा फोटो पाहिल्यावर अनेकांना आठवलं आहे. हा मुलगा मनातल्या मनात "प्यार की राह में चलना सीख, इश्क़ की आग में जलना सीख", म्हणत असेल असं या ट्विटमध्ये म्हटलंय.
-
डॉली नावाच्या मुलीने या मुलाच्या डोक्यात, 'तुझे देख देख सोना' हे गाणं वाजत असेल असं म्हटलं आहे.
-
एकाने लसीवर विश्वास नाही पण तुझ्या नजरेवर आहे असं म्हटलं आहे.
-
या फोटोत अभिमान वाटण्यासारखं काहीच नसल्याचा टोला एका मुलीने लगावला आहे. हा फोटो केवळ दोघांना अनकम्फर्टेबल करत असला तरी मजेदार आहे, असं या माया नावाच्या मुलीने म्हटलंय.
-
एकाने हा फोटो म्हणजे क्या देखतो हो सुरत तुम्हारी गाण्याची आठवण करुन देणारा असल्याचं म्हटलं आहे.
-
तेरे मस्त मस्त दो नैन मेरे दिल का ले गए चैन, अशी कॅप्शन एकाने या फोटोला दिलीय.
-
कोणत्याच पुरुषाने मेन विल बी मेनच्या नावाखाली असं वागू नये असं एकीने म्हटलं आहे. या फोटोमधील लस घेणारा तरुण आणि नर्स कोण? फोटो कुठे काढण्यात आला? यासंदर्भात कोणतीही माहिती मिळालेली नाही.
-
नर्सला दिवसातून अनेकांच्या अशा नजरांचा समाना करावा लागत असेल, असा मुद्दा एकीने उपस्थित केलाय.
-
एकाने या फोटोला हसीन दर्द असं म्हटलं आहे.
-
नर्सनेच मुलाला डोळ्यात पहायला सांगितल्याचा तर्क एकाने लावलाय.
-
एकाने हा पोरगा इंजिनियरिंगला असेल अशा जावईशोध लावलाय तर अन्य एकाने या आजारावर उपाय नाही असा टोला लगावलाय.
-
काय फायदा बघून नंतर या मुलाला नर्सला सिस्टरच म्हणावं लागणार आहे असा शाब्दिक टोला एकाने लगावलाय, तर दुसऱ्याने या अशा मुलांमुळे आम्ही सर्व बदनाम होतो, असा तक्रारीचा सूर लावलाय.
-
एकाने याला नजरेचा तीर म्हटलं आहे तर दुसऱ्याने याला लॉ ऑफ डिस्ट्रॅक्शन असं म्हटलं आहे.

प्रोटीन बारपेक्षा अधिक पौष्टिक ‘या’ आठ देशी बिया