-
ऑस्ट्रेलियाच्या अग्नेय दिशेला असणाऱ्या व्हिक्टोरिया राज्यामध्ये नुकताच मोठा पूर येऊन गेला. अतीवृष्टीमुळे येथील नद्यांना पूर आलेला. मात्र त्यानंतर येथे निसर्गाचा एक भन्नाट अविष्कार पहायाला मिळाला आहे. या राज्यामध्ये एका भागात लाखो कोळ्यांनी (स्पायडर्स) अनेक किलोमीटरच्या परिसरामध्ये एक अती विशाल जाळं विणलं आहे.
-
येथील झांडांवर, रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या दिशादर्शकांवर इतकचं काय तर गवताळ प्रदेशावर दूर दूरपर्यंत हे जाळं पसरलेलं आहे.
-
गिप्सलॅण्ड भागामध्ये मागील काही ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे येथे भूपृष्ठाजवळ राहणाऱ्या कोळ्यांनी स्वत:चा जीव वाचवण्यासाठी भराभर जमीनीपासून अधिक उंच ठिकाणी जाण्याची धडपड केली आणि त्यामधून या जाळ्यांची निर्मिती झालीय.
-
कोळी अशापद्धतीने आपत्कालीन स्थितीमध्ये भराभर जाळं विणून एकाच वेळी हलचाल करत उंच ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात त्या पद्धतीला बलुनिंग असं म्हणतात. यामध्ये कोळी त्यांच्या शरीरामधून जाळं निर्माण करण्यासाठी वापरलं जाणारं द्रव्य अगदी वेगाने बाहेर फेकत त्याच्या आधारे जास्तीत जास्त उंच ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात.
-
लाखो कोळ्यांनी एकाच वेळेस अशापद्धतीने स्थलांतर केल्याने या ठिकाणी लांबच लांब पर्यंत जाळ्याची चादर तयार झाल्याचं चित्र दिसत आहे. वरवर जरी हे एक जाळं वाटत असलं तरी अनेक जाळ्यांपासून ही चादर तयार झालीय.
-
मागील आठवड्यामध्ये व्हिक्टोरिया राज्यामध्ये जोरदार वाऱ्यांसहीत अतिवृष्टी झाली. त्यामुळे मोठ्याप्रमाणात या ठिकाणी पुराचं पाणी रहिवाशी भागात शिरलं आणि संपत्तीचं मोठं नुकसान झालं. या ठिकाणी अगदी वेगाने पाणी शिरण्यास सुरुवात झाल्याने पृष्ठभागालगत असणाऱ्या गवतामध्ये, झाडांवर राहणाऱ्या कोळ्यांनी भारभर जाळी विणण्यास सुरुवात केली. अर्थात जाळी विणणं हा त्याचा उद्देश नव्हता तर पाण्याचा वाढता स्तर पाहता लवकरात लवकर अधिक अधिक उंच ठिकाणी जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. एकाच वेळी लाखो कोळ्यांनी अशाद्धतीने स्वत:चा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामधून या ठिकाणी लांबच लांब जाळीची चादर (ज्याला गोसमेअर असं म्हणतात) निर्माण झाली.
-
सेल्स आणि लँगफोर्ड या दोन शहरांमधील भागात ही जाळी दिसून येत आहेत. ही दोन्ही शहरं एकमेकांपासून आठ किलोमीटर अंतरावर आहेत.
-
बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार गिप्सलॅण्ड भागामध्ये रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या जंगली भागामध्ये जाळं एक किलोमीटरहून अधिक लांबीचं आहे. हा आठवड्याच्या शेवटापर्यंत कोळ्यांनी विणलेली ही जाळी नष्ट होतील, असं सांगितलं जातं आहे.
-
सामान्यपणे दरवर्षी व्हिक्टोरियामध्ये हिवाळ्याच्या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीच्या संकटाला तोंड द्यावं लागतं. दरवर्षी येथे पावसाळ्यामध्ये स्वत:चा जीव वाचवण्यासाठी कोळी अशाप्रकारचे जाळी निर्माण करुन अधिक अधिक उंच ठिकाणी स्थलांतर करतात.
-
संकट काळात कोळ्यांनी विणलेली ही जाळी फार मजबूत नसतात. या जाळ्यांच्या आधारे या कोळ्यांना कमी वेळात जास्तीत जास्त लांब सुरक्षित ठिकाणी जातं यावं या उद्देशाने ती विणली जातात. अनेकदा हे कोळी वाऱ्याच्या दिशेने प्रवास करत सुरक्षित जागी पोहचण्यासाठी या जाळ्यांवरुन मार्गक्रमण करतात. कधी कधी येथे वाऱ्याचा वेग ताशी १०० किमीपर्यंतही असतो. (सर्व फोटौ : Carolyan Crossley फेसबुक तसेच रॉयटर्सच्या व्हिडीओवरुन स्क्रीनशॉर्टच्या माध्यमातून साभार)

‘आई गं, काय डान्स केला राव…’, भर कार्यक्रमात काकूंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरीही झाले शॉक