-
ब्रिटनमधील वैज्ञानिकांनी करोनासंदर्भातील एक मोठं संशोधन केल्याचा दावा केलाय. या वैज्ञानिकांनी फायर अलार्मप्रमाणे कोव्हिड अलार्म शोधल्याचा दावा केला आहे.
-
वैज्ञानिकांनी केलेल्या दाव्यानुसार एखाद्या रुममध्ये करोनाबाधित व्यक्ती आहे की नाही हे शोधण्यासाठी हा अलार्मचा वापर करता येईल. केवळ १५ मिनिटांमध्ये हा अलार्म एखाद्या खोली किंवा हॉलमध्ये करोनाबाधित व्यक्ती आहे की नाही हे ओळखू शकेल.
-
'द संडे टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार करोना संसर्गासंदर्भात माहिती देणाऱ्या या अत्याधुनिक उपकराणाचा वापर भविष्यामध्ये विमानांमध्ये, शाळांमध्ये, केअर टेकर सेंटर्समध्ये, घरांमध्ये आणि कार्यालयांमध्ये स्क्रीनिंगसाठी केला जाईल.
-
हा करोना अलार्म म्हणजे करोनाबाधितांना शोधून काढण्यासाठी अगदी सोप्पा उपाय असल्याचं सांगण्यात येत आहे. कॉर्परेट ऑफिसेसमध्ये लावण्यात येणाऱ्या स्मोक अलार्मपेक्षा हा करोना अलार्म आकाराने थोडा मोठा आहे.
-
लंडन स्कूल ऑफ हायजीन अॅण्ड ट्रॉपिकल मेडिसन आणि डरहम युनिव्हर्सिटीमधील वैज्ञानिकांनी हा आलार्म विकसित केलाय.
-
या अलार्मचे करोना चाचणीदरम्यानचे सुरुवातीचे अंदाज अगदीच बरोबर आल्याने वैज्ञानिकांना या संशोधनाकडून खूप अपेक्षा आहेत.
-
वैज्ञानिकांनी केलेल्या चाचण्यांमध्ये या यंत्राची करोनाबाधितांना शोधून काढण्याची क्षमता की ९८ ते १०० टक्क्यांपर्यंत असल्याचं दिसून आलं.
-
विशेष म्हणजे सध्या वापरण्यात येणाऱ्या आरटी पीसीआर चाचण्या आणि करोना अॅण्टीजन चाचण्यांपेक्षा हा अलार्मची करोना रुग्ण शोधून काढण्याची क्षमता अधिक असल्याचा दावा संशोधकांनी केलाय.
-
सध्या हे संशोधन अगदीच प्राथमिक स्तरावरील असल्याचं संशोधकांनी अधोरेखित केलं आहे. या प्राथमिक संशोधनासंदर्भातील एक अहवाल सादर करण्यात आला असून या अहवालाची चाचपणी अद्याप करण्यात आलेली नाही.
-
केंब्रिज शायर येथील रोबो सायन्टीफिक या कंपनीच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेला अलार्म म्हणजे एक सेन्सर आहे.
-
त्वचेमध्ये निर्माण होणाऱ्या रसायनांच्या माध्यमातून करोना संसर्गासंदर्भातील माहिती या अलार्मकडून दिली जाते.
-
करोनाबाधित व्यक्तीच्या श्वासाच्या माध्यमातून एखाद्या बंद रुममध्ये किंवा हॉलमध्ये पसरणाऱ्या कणांच्या आधारे हा अलार्म करोनाबाधितांचा शोध घेतो.
-
या सेन्सरच्या माध्यमातून बाष्पाच्या माध्यमातून पसरणारे कार्बनवर कणांचा माग घेतला जातो.
-
कुत्र्यांच्या माध्यमातूनही याचा शोध घेणं शक्य असल्याचं या अलार्मवर संशोधन करणाऱ्या टीमने म्हटलं आहे. तरी कुत्र्यांपेक्षा हा अलार्म हे कण शोधण्यामध्ये अधिक सक्षम असल्याचं संशोधक सांगतात.
-
आश्चर्याची बाब म्हणजे लक्षणं न दिसणाऱ्या करोना रुग्णांचा मागही या अलार्मच्या माध्यमातून घेता येणार आहे.
-
हा अलार्म करोनाबाधितांना शोधून काढून शकतो. कोणाला संसर्ग झालाय हे सुद्धा या अलार्मच्या माध्यमातून समजू शकतं असं सण्डे टाइम्सने म्हटलं आहे. (सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत. फोटो सौजन्य : रॉयटर्स आणि इंडियन एक्सप्रेसवरुन साभार)

20 August Horoscope: आज २० ऑगस्टला ‘या’ राशींच्या नशिबी अनपेक्षित लाभ! कामात येईल यश तर संधीचं कराल सोनं, वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य