-
अबुधाबी ग्रांप्री स्पर्धेची फायनल सर्वांसाठी ऐतिहासिक ठरली. एफ-१चा नवा वर्ल्ड चॅम्पियन रेड बुल संघाच्या मॅक्स व्हर्स्टॅपेनने इतिहास रचला आहे. वयाच्या २४ व्या वर्षी मॅक्स चॅम्पियन बनला. शेवटच्या लॅपमध्ये मॅक्सने दिग्गज लुईस हॅमिल्टनला ज्या पद्धतीने मागे टाकले, त्यावरूनही बरेच वाद झाले. मात्र त्याच्या विजयानंतर मॅक्स सेलिब्रेशन करताना दिसला.
-
मॅक्स व्हर्स्टॅपेनने गर्लफ्रेंड आणि मॉडेल केली पिकेटसह आनंद साजरा केला. दोघांनी रेस ट्रॅकवर एकमेकांना मिठी मारली आणि किस केले. जोडीदाराच्या विजयावर पिकेट ढसाढसा रडू लागली.
-
केली पिकेट एक मॉडेल, ब्लॉगर आहे आणि इंस्टाग्रामवर खूप प्रसिद्ध आहे. दोघे २०२० पासून एकमेकांना डेट करत आहेत, केली पिकेट ३३ वर्षांची आहे तर मॅक्स फक्त २४ वर्षांचा आहे. पिकेटने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सेलिब्रेशनचे फोटोही शेअर केले आहेत.
-
मॅक्सने ब्रिटनच्या लुईसचे आठव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा नवा विक्रम प्रस्थापित करण्याचे स्वप्न धुळीस मिळवले.
-
मॅक्स वेरस्टाप्पेन हा वर्ल्ड चॅम्पियन होणारा पहिला डच ड्रायव्हर बनला आहे. तसंच त्याच्या रेडबूल टीमने 2013 नंतर पहिल्यांदा एफवन स्पर्धेचं विजेतेपद पटकावले आहे.
“अजय देवगण १८ वर्षांपासून माझ्याशी बोलत नाही, माझ्या करिअरमधील सर्वात वाईट…”