-
ख्रिश्चन बांधवांसाठी ख्रिसमस (नाताळ) हा सण महत्त्वाचा असून दरवर्षी २५ डिसेंबरला साजरा केला जातो.
-
जगभरात प्रभू येशूचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
-
ख्रिसमस सणाकडे एक सांस्कृतिक उत्सव म्हणूनही पाहिलं जातं.
-
ख्रिसमस सण पूर्वसंध्येला सुरु होतो.
-
चर्चमध्ये धार्मिक प्रार्थनेचं आयोजन केलं जातं आणि एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात.
-
त्यानंतर एकमेकांना भेटवस्तू दिल्या जातात.
-
घरी केक, गोड पदार्थ केले जातात.
-
कुटुंबियांसोबत हा सण एकत्र साजरा केला जातो.
-
घराबाहेर कंदील आणि प्रभू येशूंच्या जन्माचे देखावे केले जातात.
-
येशूचा जन्म गोठ्यात झाला होता, तर जन्माचा देखावा आणि त्या काळाची प्रतिकृती म्हणून नाताळ गोठे बनवण्यात येतात.
-
ख्रिसमस सणादिवशी ख्रिसमस ट्री सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो.
-
ख्रिसमसच्या खरेदीसाठी मॉल्स व दुकाने सजवली जातात, तेव्हा त्या सजावटीत प्रामुख्याने नजरेत भरणारा असतो तो सांताक्लॉज!
-
घरोघरी जाऊन नाताळ गाणी म्हणण्याची परंपराही शहरात आहे.
-
हा सण संपूर्ण जगभरात साजरा केला जातो.
-
(सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

बापरे! महिलांनो बाजारातून कढीपत्ता घेताना सावधान! “हा” VIDEO पाहाल तर झोप उडेल; यापुढे भाजी घेताना शंभर वेळा विचार कराल