-
सूर्याच्या संक्रमणाचा उत्सव असलेल्या मकरसंक्रांतीला आकाशात भिरभिरणारे पतंग जणू सूर्याच्या दिशेनेच झेपावत असतात.
-
आकाशात भरणारी पतंगांची जत्रा शहरांत फारच क्वचित पाहायला मिळते.
-
नवी मुंबईतील घणसोली येथे शुक्रवारी पदपथावर पतंगांचा मांडव उभारुन मकरसंक्रांत साजरी करण्यात आली.
-
विविधरंगी पतंग, त्यांतून झिरपून पदपथावर पसरलेल्या रंगांच्या छटा आणि त्यातून स्वच्छंद बागडत निघालेली ही मुले…
-
मकरसंक्रांतीचा उत्साह टिपणारे हे दुश्य.
-
मकरसंक्रांतीनिमित्त तिळगुळाच्या आनंदाबरोबरच पतंगबाजीचाही आनंद लुटला.
-
करोनाचे संकट गेल्या काही दिवसांपासून पुन्हा गडद होऊ लागले असले तरी काही काळासाठी ते दूर करत तरुणाई पतंगाच्या काटा-काटीच्या खेळात रंगून गेली होती.
-
पतंगांवर यंदाही लहान मुलांच्या मालिकांमधील त्यांची आवडती पात्रे अवतरली होती.
-
(सर्व फोटो : नरेंद्र वासकर, इंडियन एक्सप्रेस)

पुढच्या वर्षी बाप्पा उशिरा येणार! ‘या’ तारखेला साजरी केली जाईल गणेश चतुर्थी