-
पाळीव प्राण्यांचे वर्तन हा शास्त्रज्ञांच्या अभ्यासाचा एक प्रमुख विषय आहे.
-
ते माणसांशी भावनिकदृष्ट्या कसे जोडले जातात? त्यांना मानवी शब्द किंवा हावभाव कितपत समजतात? याबद्दल संशोधकांचा अभ्यास सुरू असतो.
-
अनेक प्राणी प्रशिक्षणानंतर त्यांच्या समजण्याच्या क्षमतेमुळे आपल्याला आश्चर्यचकित करतात.
-
मांजर त्यापैकीच एक. शास्त्रज्ञांच्या मते मांजरींचे माणसाशी जवळचे संबंध आहेत. त्या माणसाशी वेगवेगळ्या प्रकारे संवाद साधू शकतात.
-
एका नवीन अभ्यासात शास्त्रज्ञांना असं आढळून आलंय की मांजरी स्वतःचं नाव ओळखू शकतात. याशिवाय त्या इतर मांजरींनाही नावाने ओळखू शकतात.
-
या अभ्यासानुसार, मांजरी स्वतःच्या नावाप्रमाणे इतर मांजरींची नावे ओळखू शकतात, ज्यामुळे त्या अगदी माणसाप्रमाणे मांजरींना ओळखतात.
-
याशिवाय त्या मांजरी एकाच इतर मांजरीच्या एकाच घरातील सदस्यांची नावंही ओळखू शकतात.
-
संशोधकांच्या मते ही बाब फार विचित्र नाही.
-
कारण कुत्र्याला शिकवल्यास तेही मांजरीप्रमाणे शेकडो गोष्टींची नावे लक्षात ठेवू शकतो. परंतु, कुत्र्यांच्या तुलनेत मांजरींना खूप चांगले ऐकू येते.
-
जपानमधील अजुबा विद्यापीठातील प्राणीशास्त्र संशोधक साहो ताकागी यांचा विश्वास आहे की त्यांच्या टीमने जे शोधून काढले ते आश्चर्यकारक आहे.
-
ते म्हणाले, “लोकांना सत्य कळावे अशी माझी इच्छा होती. मांजरासारखे प्राणी लोकांचे ऐकताना दिसत नाहीत, परंतु ते प्रत्यक्षात ऐकत असतात.”
-
हा प्रयोग करताना ताकागी आणि त्यांच्या सहकारी संशोधकांनी घरगुती आणि इतर वातावरणात राहणाऱ्या मांजरींचा अभ्यास केला.
-
त्यांच्या प्रयोगात, संशोधकांनी मांजरींना एका कॉम्प्युटर स्क्रीनवर त्यांच्या परिसरातील मांजरींचे एक एक फोटो दाखवले आणि मांजरींनी ते ओळखले.
-
तसेच त्यांच्या मालकाच्या आवाजात नाव घेतल्यानंतर मांजरींनी ती नावंही ओळखली.
-
हा अभ्यास छोट्या स्तरावर करण्यात आला असला तरी दैनंदिन परस्पर संवादांतर्गत घरगुती मांजरी आणि माणूस यांच्यातील संबंध दर्शवणारा करणारा हा पहिला अभ्यास आहे, असं संशोधकांचं म्हणणं आहे.
-
भविष्यात यावर मोठ्या प्रमाणात संशोधन होऊ शकतं.
-
हा अभ्यास आणि त्याचे परिणाम सायंटिफिक रिपोर्ट्समध्ये प्रकाशित झाले आहेत.
-
(सर्व फोटो pixabay वरून साभार)

PBKS vs MI: मुंबईची नंबर १ बनण्याची संधी हुकली! हार्दिकने पराभवाचं खापर कोणाच्या डोक्यावर फोडलं? सामन्यानंतर म्हणाला..