-
EPF वरील व्याजदर चार दशकांच्या निच्चांकी पातळीवर आले आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पगारदार कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. पीएफवरील चालू आर्थिक वर्षासाठी व्याजदर कमी करून ८.१ टक्क्यांवर आणला आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर ८.५ टक्के इतका होता. (फोटो- इंडियन एक्स्प्रेस)
-
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ही पगारदार कर्मचाऱ्यांसाठीची बचत योजना आहे. या योजनेद्वारे दरमहा थोड्या प्रमाणात पैसे जमा करत कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती निधी उभा केला जातो. कर्मचारी आणि कंपनी दोघंही कामगाराच्या खात्यात काही प्रमाणात पैसे जमा करत असतात. (फोटो- इंडियन एक्स्प्रेस)
-
EPF योजनेतील गुंतवणुकीतून कर्मचाऱ्यांना अनेक फायदे मिळतात. आयकर कलम ८० क अंतर्गत कर्मचारी करामध्ये लाभ घेऊ शकतो. तसेच EPF मध्ये गुंतवणूक केल्याने कर्मचाऱ्यांना कर्मचारी पेन्शन योजना (EPS) अंतर्गत निवृत्तीवेतन देखील मिळतं. (फोटो- फायनान्शिअल एक्स्प्रेस)
-
EPFO सदस्यांना ६ लाख रुपयांपर्यंतचा विमा लाभही मोफत दिला जातो. सेवानिवृत्तीपूर्वी कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास विमाधारकाच्या कुटुंबाला विम्याची रक्कम दिली जाते. (फोटो- इंडियन एक्स्प्रेस)
-
EPFO सदस्यांना आपत्कालीन कर्जाचा लाभ घेता येतो. ऑनलाइन क्लेम फॉर्म भरून हे कर्ज घेतलं जाऊ शकतं. (फोटो- फायनान्शिअल एक्स्प्रेस)
-
एखाद्या कर्मचाऱ्यानं EPF योजनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास त्याला जास्त पगार मिळतो. अधिकचे पैसे तो EPFO पेक्षा चांगला परतावा देणार्या धोकादायक बचत योजनांमध्ये गुंतवू शकतो. पण हे घातक ठरू शकतं. (फोटो- इंडियन एक्स्प्रेस)
-
EPF मधून बाहेर पडणारे कर्मचारी केवळ वर दिलेल्या फायद्यांपासूनच वंचित राहत नाही, तर कंपनीकडून कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा केले जाणारे पैसेही त्याला मिळत नाहीत. (फोटो- इंडियन एक्स्प्रेस)

“जेव्हा पक्ष सांगेल, तुझी गरज नाही आता…”, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान