-
राज ठाकरे यांचा आज ५४ वा वाढदिवस. राज हे त्यांच्या राजकारणाबरोबर व्यंगचित्रांसाठीही ओळखले जातात. राज हे सोशल नेटवर्किंगवर सक्रीय झाल्यापासून अनेकदा व्यंगचित्रांच्या माध्यमातून विरोधकांवर टिका करताना दिसतात. मागील काही काळापासून सातत्याने महाराष्ट्रामध्ये सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीवर टीका करणाऱ्या राज यांनी युतीचं सरकार असताना फडणवीस, भाजपा, पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्यावरही व्यंगचित्रांमधून टीका केलीय.
-
भाजपा, शिवसेना यांच्यावर तर राज यांनी अनेकदा टिका केली आहे. २०१८ साली दिवाळीमध्ये पाच दिवसांत पाच व्यंगचित्रांमधून राज यांनी राज्यातील युती सरकारवर टिका केली होती. त्यानंतरही अनेकदा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे. चला तर पाहूयात राज यांनी आतापर्यंत कधी कधी आणि कोणकोणती व्यंगचित्रे काढली आहेत.
-
प्रश्न एसटीचा (२१ ऑक्टोबर २०१७)
-
मनमोकळी मुलाखत म्हणत मोदींवर साधलेला निशाणा









































