-
राजकीय आखाड्यामध्ये आरोप प्रत्यारोपांचे फैरी झाडणारे नेते सध्या शेतामध्ये राबताना दिसत आहेत.
-
याच नेत्यांमध्ये आता भाजपाचे आमदार नितेश राणेंची भर पडली आहे.
-
नितेश राणे हे सध्या कोकणामध्ये असून त्यांनी गुरुवारी शेतामध्ये जाऊन अगदी नांगर हाकण्यापासूनचं काम केलं.
-
नितेश राणेंनी यावेळी टॅक्टरही चालवला.
-
शेतातील कामगारांसोबत नितेश राणेंनी भातलावणी केली.
-
यावेळे नितेश राणेंनी शेतात जेवण केलं.
-
नितेश राणेंचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
-
नितेश यांनी शेतात काम करतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.
-
“जय कोकण! जय महाराष्ट्र!”, या कॅप्शनसहीत नितेश यांनी हे फोटो शेअर केलेत.
-
नितेश राणेंच्या या शेतकामाचे व्हिडीओही व्हायरल होतायत.
-
राणे समर्थकांनी या फोटोंवर कमेंट करुन नितेश यांचं कौतुक केलंय.
-
या फोटोंना ट्विटरवर १२ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत (सर्व फोटो ट्विटर आणि व्हिडीओ स्क्रीनशॉर्टवरुन साभार)

PBKS vs MI: “बुमराहला १८ चेंडू शिल्लक असताना…”, हार्दिक पंड्याने मुंबईच्या पराभवाचं खापर नेमकं कोणावर फोडलं? सामन्यानंतर काय म्हणाला?