-
करोना विषाणूचा उद्भाव झाल्यानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक करोना रुग्ण आढळत होते.
-
मुंबईसह पुणे, ठाणे आणि इतर मोठ्या शहरांत रुग्णांचे प्रचंड हाल होत होते.
-
दरम्यानच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचा प्रमुख म्हणून अत्यंत चांगल्या प्रकारे सर्व परिस्थिती हाताळली.
-
ते दररोज फेसबूक लाईव्हद्वारे लोकांशी संवाद साधत होते. तसेच लोकांना करोना संसर्गाबाबत जागरूक करत होते.
-
मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्यानंतर आता महाराष्ट्रासह देशात करोना संसर्ग कमी झाला आहे.
-
याच पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगर पालिकेतील रुग्णालयाच्या नर्सनं आज मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांना राखी बांधून कोविड काळात केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले आहेत.

IND vs ENG: ऐतिहासिक! भारताचा ५८ वर्षांत बर्मिंगहममध्ये इंग्लंडविरूद्ध पहिला विजय; नवख्या टीम इंडियाचा विक्रम