-
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी त्यांच्या दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर पोहोचले.
-
या अटल पुलाच्या उद्घाटनापूर्वीच पीएम मोदींनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पुलाचे फोटो शेअर केले होते.
-
पंतप्रधान मोदींच्या हस्ते उदघाटन करण्यात आलेला अटल पूल हा केवळ चालणारा पूल आहे. यामध्ये फक्त पादचारी आणि सायकलस्वारांनाच चालण्याची परवानगी असेल.
-
महापालिकेने या पुलाला माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांचे नाव दिले आहे.
-
या पुलावर दिवाबत्तीचे मोठे काम करण्यात आले आहे. संपूर्ण पुलावर रंगीत आकर्षक व एलईडी रोषणाई करण्यात आली आहे.
-
अटल पूल सुमारे ३०० मीटर लांब आणि सुमारे १४ मीटर रुंद आहे. पुलाचे पश्चिमेकडील टोक फुलांच्या बागेला जोडते आणि पूर्वेकडील टोकाला कला आणि संस्कृती जोडलेली आहे.
-
या पुलाच्या बांधकामात २,६०० मेट्रिक टन स्टील पाईप वापरण्यात आले असून, रेलिंग काच आणि स्टीलचे आहे. पुलाचे छत रंगीत कापडाचे बनविले गेले आहे.
-
या पुलामुळे लोकांना नदीचा किनारा पाहण्याची संधी मिळणार आहे. रात्रीच्या वेळी ते खूप आकर्षक दिसते.सर्व फोटो’सौजन्य :ANI)
