-
भारतीय क्रिकेटर आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य करण्याची एकही संधी सोडत नाहीत. असं म्हणतात की व्यक्तीच्या मनाचा रस्ता त्याच्या पोटातून जातो कदाचित याच म्हणीचा फायदा घेत काही भारतीय क्रिकेटर हॉटेल व्यवसायात नशीब आजमावताना दिसत आहेत.
-
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली लवकरच आपलं नवीन हॉटेल उघडण्याच्या तयारीत आहे. यासाठी त्याने प्रसिद्ध अभिनेत किशोर कुमार यांच्या बंगल्याचा मोठा भागही भाड्याने घेतला आहे.
-
यापूर्वीही विराटने २०१७ साली दिल्लीच्या आरके पुरममध्ये Nueva नावाचं रेस्टॉरंट सुरु केलं आहे.
-
त्याशिवाय दिल्लीतच विराटच One8commune नावाचं रेस्टॉरंट आहे.
-
दिल्लीसोबत कोलकात्याही विराटच्या या हॉटेलची ब्रॅन्च आहे.
-
टीम इंडियाचा उत्साही अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याने १२ डिसेंबर २०१२ रोजी राजकोटमध्ये ‘जड्डूचे फूड फील्ड’ नावाचे रेस्टॉरंट उघडले.
-
या रेस्टॉरंटमध्ये मेक्सिकन, चायनीज, थाई, भारतीय, कॉन्टिनेंटल आणि पंजाबी यांसारखे पदार्थ मिळतात. तसेच हे रेस्टॉरंट पदार्थांसोबत तेथील उत्साही वातावरणासाठीही प्रसिद्ध आहे.
-
भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान हा कसोटी क्रिकेटमधील अव्वल भारतीय वेगवान गोलंदाजांपैकी एक मानला जातो. जहीरने मुंबईत रेस्टॉरंट सुरु केले आहे. क्रिकेट कारकिर्दीप्रमाणेच जहीरने हॉटेल व्यसायातही मोठे यश संपादन केले आहे.
-
मुंबईपाठोपाठ त्याने २००४-२००५ साली पुण्यात ‘डायन फाइन’ नावाचे रेस्टॉरंट उघडले. या रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना आत आणि बाहेर जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे तुम्ही जेवणासह मित्रांसोबत तुमचा दर्जेदार वेळ घालवू शकता. हे रेस्टॉरंट खूप महाग आहे, परंतु स्वादिष्ट परंतु खवैय्यांसाठी हे उत्तम ठिकाण आहे.
-
तुम्हाला क्रिकेट आवडत असल्यास किंवा क्रिकेट थीम असलेल्या रेस्टॉरंटमध्ये खायचे असल्यास, बिहारमधील पाटणा येथील कपिल देवचे ‘इलेव्हन्स’ हे हॉटेल उत्तम ठिकाण आहे.
-
इलेव्हनच्या मेनूमध्ये भारतीय आणि चायनीज पाककृतींव्यतिरिक्त कपिल देव यांच्या आवडत्या पदार्थांचा समावेश आहे. तसेच मेनुकार्डमध्ये काही थाई पदार्थांचाही समावेश आहे.
-
माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली यांचे कोलकात्यात ‘पव्हेलियन’ नावाचे रेस्टॉरंट आहे. हे रेस्टॉरंट क्रिकेट थीमवर असून यामध्ये १०० हून अधिक संस्मरणीय वस्तू आहेत.
-
रेस्टॉरंटमध्ये सचिन तेंडुलकर, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, व्हीव्हीएस लक्ष्मण, शाहिद आफ्रिदी, ख्रिस गेल, डेव्हिड वॉर्नर आणि इतरांसारख्या दिग्गजांच्या स्वाक्षऱ्यांसह १०० हून अधिक क्रिकेट संस्मरणीय वस्तू आहेत. रेस्टॉरंटमध्ये पारंपारिक तंदूर, भारतीय आणि चायनीज पदार्थ तुम्हाला चाखायला मिळतील.
-
सचिन तेंडुलकरच्या रेस्टॉरंटचे नाव ‘Tendulkar’s World’ आहे. रेस्टॉरंटमधील प्रत्येक क्रॉकरीवर सचिन तेंडुलकरची सही असते.
-
रेस्टॉरंटमध्ये सचिन तेंडुलकरला आवडणाऱ्या पदार्थांचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. हे रेस्टॉरंट मुंबईच्या छत्रपती शिवाजी मार्गावर आहे.

Jagdeep Dhankhar: जगदीप धनखड उपराष्ट्रपती असताना त्यांना बुलेटप्रूफ वाहनही नाकारले, ६ महिने साध्या इनोव्हातून प्रवास; राजीनाम्याआधी काय घडलं?