-
काही जुळी भावंडं अशी असतात जी दिसायला अगदी सेम टू सेम दिसतात. काढीमात्रही त्यांच्यात फरक नसतो. त्यांनी एकसारखे कपडे घातले की त्यांना ओळखणंच अशक्य.
-
काही भावंडांच्या तर चेहऱ्याप्रमाणेच आवडीनिवडी आणि स्वभावही सारखाच असतो. अशावेळी लोक त्यांना तुम्ही दोघंही एकाच व्यक्तीशी लग्न करू नका, असं मजेत म्हणतात.
-
पण हे प्रत्यक्षात केलं आहे, दोन जुळ्या बहिणींनी. अगदी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सेम-टू-सेम दिसणाऱ्या या बहिणींचं सर्वकाही सारखं आहे. अगदी नवराही…
-
ऑस्ट्रेलियातील अॅना आणि लुसी डिसिंक या जुळ्या बहिणींनी हे प्रत्यक्ष करून दाखवलंय. त्यांना प्रत्येक गोष्ट एकत्र करायला आवडते.
-
फक्त सारखे कपडे घालतात असं नाही. तर त्यांचं खाणं-पिणं, वर्कआऊट, झोपणं अशी दैनंदिन कामंही एकत्रच असतात. अगदी अंघोळ करतानाही त्या एकत्रच करतात आणि वॉशरूममध्येही एकत्रच जातात.
-
इथपर्यंत ठीक होतं. पण आता दोन्ही सुंदर बहिणी एकाच व्यक्तीला बेन बायर्नला बऱ्याच काळापासून डेट केल्यानंतर रिलेशनशिपमध्ये आल्या आहेत.
-
या अपडेटनंतर, तिच्या प्रेग्नेंसीबद्दल काय बातमी आहे, चला जाणून घेऊया.
-
या दोन्ही जुळ्या बहिणी ऑस्ट्रेलियाच्या पर्थमध्ये राहतात. ज्यांच्या कथा टीव्ही मालिकांपासून ते वृत्तवाहिन्यांपर्यंत पसरल्या आहेत.
-
तुम्ही जगात अनेक एकसारखे जुळे पाहिले असतील. पण या दोघी बहिणी पुन्हा एकदा त्यांच्या लाइफस्टाइलमुळे आणि एकाच व्यक्तीशी लग्न केल्यामुळे चर्चेत आल्या आहेत.
-
अॅना आणि लुसी या दोघींचे वय ३७ वर्षे आहे. पूर्वी त्यांचे बॉयफ्रेंड वेगळे होते, पण गेल्या अनेक महिन्यांपासून त्या दोघी एकाच व्यक्तीला डेट करत आहेत.
-
दोघेही नेहमी एकाच रंगाचे आणि स्टाईलचे कपडे घालतात. सेम टू सेम मेकअप, फॅशन आणि स्टाइलमध्ये दिसतात. आता परिस्थिती अशी झाली आहे की, दोघांनी एकत्र आणि एकाच पतीसोबत गरोदर असल्याचे जाहीर केले आहे.
-
जुळ्या बहिणी त्यांचे प्रत्येक फोटो इन्स्टाग्रामवर खास कॅप्शनसह पोस्ट करतात. ज्यामध्ये ती अनेकदा लिहिते की ‘चांगल्या गोष्टी तीनसोबत येतात’.
-
अॅना आणि लुसी म्हणतात की ते ‘सर्व काही एकत्र शेअर करतात’ आणि ‘कधीही वेगळे होऊ शकत नाहीत’, या दोघांनी बेन बायर्नशी लग्न केले आहे.
-
काही काळापूर्वी दोघांनीही आपल्या फॅमिली प्लॅनिंगबद्दल इन्स्टाग्रामवर सांगितले होते की, ते एकाच पतीसोबत एकाच वेळी गरोदर राहण्याचा प्रयत्न करत आहेत.
-
दोन्ही बहिणींच्या कथा अमेरिकन न्यूज चॅनल्सच्या हेडलाइन बनल्या आहेत. अॅनाने फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, अनेकांना वाटेल की एकच नवरा शेअर करणे अपारंपरिक आणि चुकीचे आहे, परंतु आम्हा बहिणींकडे दुसरा पर्याय नाही.(All Photos : Instagram/annalucydecinque)

“Apple ला राजकारणाची नव्हे…”, भारतात उत्पादन करू नका म्हणणाऱ्या ट्रम्प यांना प्रत्युत्तर