-
श्रीमंत आणि यशस्वी व्यक्ती होण्यासाठी कठोर परिश्रम, कौशल्य आणि शिस्त अंगी असावी लागते. काहींचा असा विश्वास आहे की या सर्व गोष्टींव्यतिरिक्त, नशीब देखील खूप महत्वाचे आहे. ज्योतिषशास्त्रावर लोकांची नेहमीच खूप श्रद्धा आहे. आज आम्ही भारतातील अशा अब्जाधीशांबद्दल सांगणार आहोत जे ज्योतिष शास्त्रावर विश्वास ठेवतात.
-
अंबानी कुटुंब
अंबानी कुटुंबाचा ज्योतिषशास्त्रावर प्रचंड विश्वास आहे आणि मोठी कामे सुरू करण्यापूर्वी अनेकदा ज्योतिषी-संख्याशास्त्रज्ञांचा ते सल्ला घेतात. (स्रोत: @ambanifamily/instagram) -
अमिताभ बच्चन
बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी हिरवे पन्ना रत्न आणि हातात निळा नीलम धारण केला आहे, कारण त्यांचा वैदिक ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे. (स्रोत: अमिताभ बच्चन/फेसबुक) -
एमएस धोनी
एमएस धोनीदेखील खूप आध्यात्मिक आहे आणि तो संख्याशास्त्रावर खूप विश्वास ठेवतो. त्यासाठी 7 क्रमांक भाग्यवान आहे, असं तो मानतो. त्याच्या जर्सीवरच सात क्रमांक नाही तर, तो संध्याकाळी 7 वाजता किंवा महिन्याच्या 7 तारखेलाच महत्त्वाचे डील करतो. (स्रोत: एमएस धोनी/फेसबुक) -
नवीन जिंदाल
अब्जाधीश आणि उद्योगपती नवीन जिंदाल यांचा ज्योतिषशास्त्रावर मोठा विश्वास आहे. त्यांनी कुंडलीनुसार मुलांची नावे ठेवली आहेत. (स्रोत: नवीन जिंदाल/फेसबुक) -
शाहरुख खान
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचीही रत्नांवर नितांत श्रद्धा आहे. किंग खान अनेक वर्षांपासून हातात पन्ना रत्ने धारण करतो आहे. कारण, हे रत्न तो आपल्यासाठी भाग्यवान मानतो. (स्रोत: शाहरुख खान/फेसबुक) -
सलमान खान
तुम्ही बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खानला पिरोजा ब्रेसलेट घातलेला पाहिला असेल. फिरोजा व्यक्तीला नकारात्मक उर्जेपासून दूर ठेवते. सलमान या ब्रेसलेटला स्वतःसाठी खूप लकी मानतो. (स्रोत: सलमान खान/फेसबुक) -
प्रियांका चोप्रा
हॉलिवूडमध्ये आपली प्रतिभा दाखवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राचीही ज्योतिषशास्त्रावर गाढ श्रद्धा आहे. तिने असेही नमूद केले आहे की ती तिच्या आयुष्यातील कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी अनेकदा ज्योतिषांचा सल्ला घेते. निक जोनासशी लग्न करण्यापूर्वी तिने ज्योतिषीय मार्गदर्शनही घेतले होते. (स्रोत: प्रियांका चोप्रा/फेसबुक) -
संजय दत्त
संजय दत्त ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार मोती आणि पिवळा पुष्कराज देखील घालतो. त्यांच्या मते, जेव्हापासून त्यांनी हा दगड घातला आहे, तेव्हापासून त्यांचे जीवन सुकर झाले आहे. (स्रोत: संजय दत्त/फेसबुक)

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”