-
सध्याच्या सर्वात मोठ्या ऑनलाईन फूड डिलीव्हरी पार्टनर्सपैकी एक असणाऱ्या स्विगीवर हल्ली मोठ्या संख्येनं ग्राहकांच्या ऑर्डर्स येत आहेत.
-
स्विगीनं नुकत्याच त्यांच्या Swiggy Instamart या ऑनलाईन ग्रोसरी डिलिव्हरी अॅपवरील माहिती ट्वीट केली आहे. यातून काही भन्नाट गोष्टी समोर आल्या आहेत!
-
आयपीएलच्या हंगामात स्विगीवर आलेल्या भन्नाट ऑर्डर्सची आकडेवारीच स्विगीनं आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केली आहे.
-
३१ मार्चपासून २९ मेपर्यंत स्विगी आणि स्विगी इन्स्टामार्टवर आलेल्या ऑर्डर्सची आकडेवारी यात समाविष्ट करण्यात आली आहे.
-
स्विगीवर आयपीएलच्या यंदाच्या पर्वादरम्यान सर्वाधिक ऑर्डर्स आल्या त्या बिर्याणीच्या! या काळात बिर्याणीच्या तब्बल १ कोटी २० लाखाहून अधिक ऑर्डर्स आल्या.
-
आयपीएलच्या काळात स्विगीवर मिनिटाला सरासरी २१२ बिर्याणीच्या ऑर्डर इतक्या वेगानं या ऑर्डर्स आल्या आहेत! आयपीएलची ट्रॉफी जरी चेन्नईनं जिंकली असली, तरी स्विगीवरची ही ट्रॉफी बिर्याणीनं जिंकली आहे!
-
यात देशभरातून प्रत्येक एका व्हेज बिर्याणीमागे तब्बल २० नॉन व्हेज बिर्याणी असं प्रमाण असल्याचं स्विगीकडून सांगण्यात आलं आहे.
-
आयपीएलच्या यंदाच्या हंगामाच्या काळात स्विगीवरून तब्बल २३२४ कंडोम खरेदी झाले!
-
यावर खट्याळ ट्वीट करताना स्विगीनं “असं वाटतंय की आज २२हून जास्त खेळाडू खेळतायत” अशी टिप्पणीही केली!
-
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात स्विगीवर तब्बल ३ लाख ६८ हजार ३५३ जिलेबी-फाफडाच्या ऑर्डर्स आल्या.
-
यावर स्विगी ट्वीटमध्ये म्हणते “आमची पैज आहे की जिलेबी-फाफडाच्या किमान निम्म्या ऑर्डर्स तरी गोकुलधाम सोसायटीमधून आल्या असणार!” गोकुलधाम सोसायटी ‘तारक मेहता का उलटा चष्मा’मुळे चांगलीच फेमस झाली आहे!
-
आयपीएल फायनलच्या एका दिवसात स्विगी इन्स्टामार्टवरून एकट्या चेन्नईतून ३ हजार ६४१ दही आणि ७२० साखरेच्या ऑर्डर्स करण्यात आल्या.
-
स्विगीनं दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतल्या एकाच ग्राहकानं यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये तब्बल ७०१ समोसे ऑर्डर केले!
-
संपूर्ण आयपीएल हंगामात स्विगीच्या फूड डिलीव्हरी पार्टनर्सनी तब्बल ३३ कोटी किलोमीटर्सचा प्रवास करून ग्राहकांच्या ऑर्डर्स पोहोचवल्या आहेत!
-
रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला यंदाच्या आयपीएलमध्ये फारशी चमक दाखवता आली नाही, पण स्विगीवरून जेवण ऑर्डर करण्यात मात्र बँगलोर आघाडीवर राहिले!
-
यंदाच्या सीजनमध्ये बँगलोर शहरानं स्विगीवरून तब्बल १ कोटी २० लाखांहून जास्त ऑर्डर्स केल्या आहेत.

IPL Playoffs: आरसीबीच्या विजयाने या ५ संघांचं टेन्शन वाढलं! कोणते ४ संघ प्लेऑफ गाठणार? पाहा संपूर्ण समीकरण