-
सध्या मुंबईत सेंट्रल, हार्बर किंवा वेस्टर्न कुठेही घर घ्यायचं बघत असाल तर त्याचं उत्तर एकच आहे, “आजाओ दीखा दुंगा.” अर्थातच एव्हाना समजलं असेल की याचं एकमात्र उत्तर आहे ते म्हणजे भावेश कावरे.
-
सध्या भावेश सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याच्या खास शैलीतील व्हिडीओज एवढे व्हायरल झाले आहेत की त्यावर बड्याबड्या सेलिब्रिटीजपासून फॉरेनर्सनीदेखील रील बनवले आहे.
-
“घर पाहिजे असेल तर भावेश भाईला कॉल करा…डीमार्ट जवळ या…भावेश सगळे प्रोजेक्ट दाखवेल.” ही त्याच्या रील्समधील हमखास ठरलेली वाक्य असतात.
-
आज प्रॉपर्टी क्षेत्रात एवढं नाव कमावणारा शिवाय या क्षेत्राला एक वेगळंच ग्लॅमर मिळवून देणाऱ्या भावेश कावरेबद्दलच आपण आज जाणून घेणार आहोत.
-
सोशल मीडियावर त्याला ‘Property Transaction Guru’ म्हणून ओळखतात, पण भावेशचा हा प्रवास नेमका कसा होता, त्याचं शिक्षण किती झालं अन् तो या क्षेत्रात कधी आला याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. ‘रेडियो सिटी’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये भावेशने या सगळ्या गोष्टींचा उलगडा केला आहे.
-
भावेशचा जन्म १४ जुलै १९९९ मध्ये झाला. तो मूळचा आळे फाट्याचा. भावेशचे आजोबा गोदरेज कंपनीमध्ये कामाला होते. १९९२ मध्ये आर्थिक मंदीमुळे त्यांची नोकरी गेली अन् ते मुंबईत आले.
-
भावेशच्या आजोबांनी सर्वप्रथम भाजीचा व्यवसाय सुरू केला होता. त्यामध्ये भावेशचे वडील अन् त्यांचे भाऊ यांनीही हातभार लावला. त्यानंतर त्यांनी घरातच एक छोटेखानी दुकान सुरू केलं जिथे ते भाजी अंडी आणि इतर वस्तू विकू लागले. काही दिवसांनी भावेशच्या वडिलांनी कोंबडया विकायचा व्यवसायही सुरू केला. अशा रीतीने भावेशच्या वडिलांनी त्यांचा व्यवसाय वाढवला अन् आज त्यांची ८ दुकानं आहेत.
-
भावेश आजही रविवारी कांजुर मार्गच्या त्यांच्या दुकानात जाऊन काम करतो.
-
भावेशचा शिक्षणात फारसा रस नव्हता. त्याने १० वी नंतर शिक्षण सोडलं. १० वीची परीक्षा त्याने ३ वेळा दिल्याचंही या मुलाखतीमध्ये कबूल केलं. पुढील महाविद्यालयीन शिक्षण त्याने घेतलं नाही.
-
कोविडच्या आधी भावेश प्रचंड मस्ती धमाल करायचा. मित्र मैत्रिणींबरोबर फिरायचा. त्याचे टिकटॉकवरही ६० हजार फॉलोअर्स होते, पण कोविडनंतर मात्र त्याने व्यवसायात शिरायचं ठरवलं. २०१९ मध्ये भावेशने सेल्समध्ये काम सुरू केलं.
-
आज भावेश प्रॉपर्टी डीलिंगमध्ये सगळ्यात लोकप्रिय असा डीलर आहे. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून या क्षेत्राला एक वेगळं फेम आणि ग्लॅमर त्याने मिळवून दिलं आहे.
-
फोटो सौजन्य : सोशल मीडिया / भावेश कावरे : फेसबुक आणि इंस्टाग्राम)

“किती गोड!”, ‘आई नहीं’ गाण्यावर थिरकली चिमुकली; थेट श्रद्धा कपूरला दिली टक्कर, Viral Video पाहू नेटकऱ्यांनी केलं कौतुक