-
उद्धव ठाकरेंनी भाजपा नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
-
तुम्ही जर खरे सावरकरप्रेमी असाल तर देशाला आपल्या बुडाखाली घेणाऱ्या तुमच्या नेत्यांचा धिक्कार करा. हिंमत असेल तर हे करून दाखवा, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं.
-
काही दिवसांपूर्वी कर्नाटक सरकारने शालेय अभ्यासक्रमातून वीर सावरकरांचा धडा वगळला आहे. यावरून देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. संबंधित प्रकरणावर तुमचं मत काय आहे? असा सवाल फडणवीसांनी विचारला.या विधानावरून उद्धव ठाकरेंनी खरपूस समाचार घेतला आहे.
-
देवेंद्रजी, तुमची परिस्थिती फार हलाखीची आहे- उद्धव ठाकरे
-
सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, याचं उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस – उद्धव ठाकरे
-
कारण त्यांचा होणारा अपमान त्यांना सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. कारण वरून आदेश आला आहे- उद्धव ठाकरे
-
कर्नाटक सरकारने सावरकरांचा धडा वगळला आहे, याचा शिवसेना निषेध करतेच – उद्धव ठाकरे
-
सावरकरांनी कष्ट करून, मरण यातना भोगून जो देश स्वातंत्र्य केला, तो देश ज्याचा स्वातंत्र्यसंग्रामात काडीचाही संबंध नव्हता, अशी एखादी विचारधारा तिच्या जोखडाखाली आणू इच्छिते आहे, यावर तुमचं मत काय? – उद्धव ठाकरे
-
सावकरांनी मोदी आणि फडणवीसांसाठी कष्ट आणि हालअपेष्टा भोगल्या होत्या का? – उद्धव ठाकरे
-
देवेंद्र फडणवीसजी, तुम्ही जर खरे सावरकरप्रेमी असाल, तर आपल्या देशाला स्वत:च्या बुडाखाली घेणाऱ्या तुमच्या नेत्यांचा धिक्कार करा – उद्धव ठाकरे
-
हिंमत असेल तर धिक्कार करून दाखवा – उद्धव ठाकरे
-
देशाचं स्वातंत्र आणि देशाची लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी आम्ही भाजपा व्यतिरिक्त इतर पक्ष एकत्र येतोय – उद्धव ठाकरे

“सनी देओल माझ्या आयुष्यातील सर्वात काळा अध्याय, देव सगळं बघतोय, न्याय होईल”