-
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह एनसीपीच्या काही आमदारांनी बंडखोरी केली आहे.
-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीरगटाने शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. यावेळी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची तर इतर आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
-
अजित पवार गट सत्तेत सामील झाला असला तरी या गटाने अद्याप सर्व समर्थक आमदारांना एकत्रित बोलावून शक्तीप्रदर्शन केलं नाही. त्यामुळे अजित पवार गटाकडे नेमके किती आमदार आहेत? याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
-
दरम्यान, माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार गटाच्या भवितव्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीर गटाकडे ३६ आमदार नाहीत. अजूनपर्यंत त्यांच्याकडे ३६ आमदार दिसले नाहीत- पृथ्वीराज चव्हाण
-
अजित पवार गटाकडे ३६ आमदार असते तर त्यांनी प्रदर्शन केलं असतं. त्यांचा फोटो काढला असता – पृथ्वीराज चव्हाण
-
अजित पवार गटाकडे दोन-तृतीयांश आमदार नसतील, तर महाराष्ट्रात आणखी एक मोठा राजकीय भूकंप होईल – पृथ्वीराज चव्हाण
-
ज्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे, ते सर्व आमदार निलंबित होतील – पृथ्वीराज चव्हाण
-
फुटीर गटातील आमदारांचं सदस्यत्व रद्द झाल्यानंतर संबंधित आमदारांना विद्यमान विधीमंडळात मंत्री होता येणार नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे- पृथ्वीराज चव्हाण

IND vs ENG: ड्रीम विकेट! आकाशदीपने रूटला केलं क्लीन बोल्ड; ‘तो’ बॉल पाहून सगळेच चकित, गिलने डोक्याला लावला हात; VIDEO व्हायरल