-    मरिन ड्राइव्ह… हे दोन शब्द पुरेसे आहेत एखाद्या मुंबईकराच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी. 
-    मुंबईतील सर्वात लोकप्रिय जगांपैकी एक अशी जागा मरिन ड्राइव्ह. 
-    मरिन ड्राइव्हला मित्रमैत्रिणी आणि कुटुंबाबरोबर ‘प्लॅन’ करुन गेला नाही असा अस्सल मुंबईकर सापडणे कठीण. 
-    ही जागा प्रत्येक मुंबईकरासाठी खास आहे. अनेकजण मस्करीत म्हणतात, ‘मरिन ड्राइव्ह नही देखा तो क्या देखा.’ हेच मुंबईकरांचे लाडके पर्यटनस्थळ. 
-    मरीन ड्राईव्ह गेलं की किनाऱ्यावर दिसतात त्रिकोणी दगड. पण तुम्हाला माहितेय का मुंबईतील मरीन ड्राईव्हच्या किनाऱ्यावर दगड का ठेवलेत? 
-    मुंबईतील मरीन ड्राईव्हच्या किनाऱ्यावर एकसारखे दगड कुठून आले, हे तुम्हाला माहितेय, चला तर जाणून घेऊया याच प्रश्नाचे उत्तर 
-    १८ डिसेंबर १९१५ या दिवशी गिरगाव चौपाटीजवळ पहिला दगड ठेऊन मरिन ड्राइव्ह बांधण्यास सुरुवात करण्यात आली होती. 
-    आपल्यापैकी फारच कमी लोकांना ठाऊक असेल की मरीन ड्राईव्हचा काही भाग हा रिक्लेम केलेला म्हणजेच समुद्रात भराव टाकून उभारण्यात आलेला आहे. 
-    समुद्राला कृत्रीमरित्या आत सरकवून तयार केलेल्या मोकळ्या जागी मरीन ड्राईव्हवरील कित्येक इमारती आणि रस्ते उभे आहेत. 
-    त्यामुळे रोजच्या रोज अरबी समुद्रातून येणाऱ्या तडाखेबाज लाटांपासून त्यांचे संरक्षण करणे गरजेचे बनते. 
-    याच वेगवान आणि शक्तिशाली लाटांपासून किनाऱ्याचे संरक्षण करण्यासाठी मरीन ड्राईव्हवर ठेवण्यात आलेले तीनपायी सिमेंटचे दगड कामी येतात. 
-    या दगडांना दगडांना ‘टेट्रापॉड’ म्हणतात. टेट्रापॉड नैसर्गिक नसून ते मानवाने बनवले आहेत आणि ते दगड एका खास कारणासाठी बनवले गेले आहेत. हे सर्व दगड समान आकाराचे आहेत. 
-    जेव्हा समुद्रातील महाकाय लाटा टेट्रापॉडवर येऊन आदळतात तेव्हा या लाटांचा तडाखा हे दगड झेलतात. 
-    मरिन ड्राइव्हच्या कठड्यावर सतत लाटा धडकत असल्याने हा लाटांचा मार शोषण्यासाठी संपूर्ण परिसरात टेट्रापॉडचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे हे दगड समुद्राच्या कठड्यावर ठेवण्यात आले आहेत. 
-    नव्वदच्या दशकात हे दगड मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आणण्यात आले होते. मरिन ड्राइव्हरील या टेट्रापॉडची एकूण संख्या साडेसहा हजारहून अधिक आहे. (फोटो सौजन्य : संग्रहित छायाचित्र) 
 
  अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात, धोका होण्याआधी… 
   
  
  
  
  
  
  
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  