-
‘घर पाहावं बांधून’ हे आपण असंख्य वेळा ऐकलं आहे. पण उत्तर प्रदेशमध्ये एका व्यक्तीनं खरंच स्वत: घर बांधून पाहिलं आहे. पण जमिनीवर नव्हे, जमिनीखाली!
-
उत्तर प्रदेशच्या हरदोई भागामध्ये राहणाऱ्या इरफान अहमद यांनी चक्क जमिनीच्या खाली दोन मजल्यांचं आणि १० खोल्यांचं घर बांधलं आहे!
-
इरफान अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार या घरामध्ये १० ते ११ खोल्या आहेत. एक विहीर आहे, एक बैठकीची खोली आहे. एक छोटी बाल्कनीही आहे!
-
“इथे मी विहीरही खोदली आहे. त्यात पाणीही आहे. त्याचं पाणी आणि आधी पीतही होतो. चांगलं पाणी होतं. पण आता काही लोकांनी त्याचं पाणी खराब केलं. त्यामुळे आम्ही आता त्या विहिरीचं पाणी पीत नाही”, असं अहमद म्हणतात.
-
इरफान अहमद यांना पप्पू बाबा म्हणूनही या परिसरात ओळखलं जातं. २०११ च्या आधी ते शिवणकाम करत होतं. पण नंतर त्यांनी ते काम सोडलं.
-
पप्पू बाबांनी चक्क निवडणूकही लढवली होती. पण त्यात ते पराभूत झाले. त्यानंतर ते आध्यात्माकडे वळले. आपल्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी हा बंगला ‘खोदून काढला’ आहे.
-
“याची सुरुवात वगैरे कधी झाली हे सांगता येणार नाही. पण कुणी साधूबाबा वगैरे असतील तर ते कुठे डोंगरावर जाऊन बसतात. किंवा एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली बसतात. तिथे बसून ते त्यांची साधना करतात” असं इरफान अहमद सांगतात.
-
“माझ्या मनात एक विचार आला की तुझी स्वत:ची जागा आहे. तिथे तू स्वत:चं जग निर्माण कर. मग मी इथे माझं घर तयार केलं. याला आपण दोन मजली घर म्हणू शकतो”, अशी माहिती त्यांनी दिली.
-
“या घराचं काम मी २०११ पासून सुरू केलं होतं. २०११ च्या आधी मी वेगळं काम करत होतो. मी निवडणूकही लढलो होतो. पण पराभूत झालो होतो. त्यानंतर मी आध्यात्माकडे वळलो” अशी माहिती पप्पू बाबा यांनी दिली.
-
“ही माझी वंशपरंपरागत जमीन होती. इथे मातीचा ढिगारा होता फक्त. मग मी इथे खोदकाम करून हे घर बांधलं. गेल्या १२ वर्षांपासून मी या घरावर काम करत आहे. अजूनही पुढे काम करायचं आहे”, असंही त्यांनी सांगितलं.
-
इरफान अहमद उर्फ पप्पू बाबा यांनी जमिनीच्या खाली खोदून तयार केलेलं हे दोन मजली घर, त्यातल्या खोल्या म्हणजे बांधकामाचा जगावेगळा नमुना मानला जात आहे.
-
सध्या या घराची जोरदार चर्चा असून आसपासच्या गावांमधले लोकही त्यांचं हे घर पाहायला येत आहेत.
-
दिवसभर घराचं काम करून संध्याकाळी ते आपल्या कुटुंबीयांसमवेत वेळ घालवतात!
आता काय जीवच घेणार का? महिलांनो बाजारातून भाजी घेताना सावधान; शेतातला VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल