-
माता राणी वैष्णो देवी मंदिर देशभरात खूप लोकप्रिय आहे.
-
दरवर्षी, या ठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात.
-
एका अहवालानुसार दरवर्षी सुमारे ५०० कोटी रूपयांची देगणी भाविकांकडून मंदिराला दिली जाते.
-
केरळच्या तिरुअनंतपूरममध्ये असलेलं पद्मनाभ स्वामी मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर मानलं जातं.
-
एका अहवालानुसार, या मंदिराच्या 6 तिजोऱ्यांमध्ये सुमारे २० अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.
-
पद्मनाभ स्वामी मंदिरात भगवान महाविष्णूची सोन्याची मूर्ती असून त्याची साधारण किंमत ५०० कोटी रुपये इतकी आहे.
-
महाराष्ट्रात असणाऱ्या अहमदनगरातील शिर्डी साई बाबा मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे.
-
देश-विदेशातील लाखो भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात.
-
शिर्डी साई संस्थानने दिलेल्या माहितीनुसार, भाविकांकडून या मंदिराला दरवर्षी सुमारे ४८० कोटी इतके देणगी दिली जाते.
-
मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर प्रसिद्ध आहे.
-
सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत असे लोक श्री दर्शन व आपला नवस मागण्यासाठी येथे येतात.
-
एका वृत्तानुसार, दरवर्षी मंदिरात जवळ-जवळ ७५ ते १२५ कोटी इतकी रक्कम भाविकांकडून देगणी स्वरुपात देण्यात येते.
-
पंजाबमधील अमृतसरमध्ये स्थित गोल्डन टेम्पल शीख लोकांचे श्रद्धास्थान मानले जाते.
-
जगभरातील अनेक शीख व पंजाबी लोक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात.
-
या मदिरांमध्ये आत्तापर्यंत जवळपास ४०० किलो सोने भक्तांनी दान केले आहे.
-
आंध्र प्रदेशच्या तिरुमालामध्ये असलेलं तिरुपती बालाजी मंदिर हे देशातील एक अत्यंत प्रतिष्ठित आणि श्रीमंत मंदिर आहे.
-
. या मंदिरात दरवर्षी साधारण ६० हजारहून अधिक भाविक देव-दर्शनासाठी येत असतात.
-
दरवर्षी या मंदिराला भाविकांकडून ६५० कोटी इतकी देणगी देण्यात येते.

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case